Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

गोगावच्या सरपंच सौ. वनिता  सुरवसे यांना राज्यस्तरीय यशवंत गौरव पुरस्कार

Admin by Admin
September 30, 2024
in सामाजिक
0
गोगावच्या सरपंच सौ. वनिता  सुरवसे यांना राज्यस्तरीय यशवंत गौरव पुरस्कार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट (प्रतिनिधी) : अविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन इंडियाच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने शिक्षक दिनाच्या निमित्ताने राज्यभरातील शिक्षकांचा सन्मान सोहळा सोलापूर येथे आयोजित करण्यात आला होता. शिक्षक सरपंच आणि उद्योजक अशा तिन्ही क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या मान्यवराचा सन्मान अविष्कार चे राष्ट्रीय अध्यक्ष  संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या सोहळ्यात अक्कलकोट तालुक्यातील गोगावच्या सरपंच सौ वनिता सुरवसे  यांचा राज्यस्तरीय यशवंत गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.  सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष  एड. विकास जाधव यांच्या हस्ते आणि श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत येडेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरचे पुरस्कार प्रदान केले.
              सरपंच सौ वनिता सुरवसे यांना सरपंच परिषदेने सोलापूरच्या जिल्हा समन्वयक असुन परिषदेमार्फत सर्व सरपंचांना मार्गदर्शन  करत वेगवेगळ्या आंदोलनात सरकारला वेठीस धरून मागण्या पूर्णत्वास आणल्या. त्यांच्या गावामध्ये मोठ मोठी कामे करून अक्कलकोट तालुक्यातचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गोगाव ग्रामपंचायत चे नाव उज्वल केले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील, पदमश्री श्री पोपटराव पवार, सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे उपाध्यक्ष एड. विकास जाधव  यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक चिरंजीव कामे ग्रामपंचायत मध्ये करून ग्रामपंचायतचा महसूल तिपटीने वाढविला. महाराष्ट्रातील ग्रामविकास मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय कृषिमंत्री, केंद्रीय ग्रामविकास मंत्री यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना निवेदन देऊन ग्रामपंचायत च्या अडचणी सांगितल्या.वेळोवेळी त्यांचे केलेले काम पाहून, कामाची दखल घेऊन अविष्कार फाउंडेशनने त्यांना राज्यस्तरी यशवंत गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले.  त्याबद्दल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री संजय पवार व अन्य मान्यवरांचे  सरपंच सौ वनिता सुरवसे यांनी  मनःपूर्वक आभार मानले आहे.
                या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते उमेश पाटील, अविष्कार चे जिल्हाध्यक्ष  सात पटेल, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष   मनोज कंगळे, जिल्हा संघटक सौ स्नेहल खंकाळ, रेखा सोनकवडे, ए बी शेख,जब्बार सिकलगार, शंकरराव देशमुख,संतोष गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन  संजय घोडके  यांनी केले.

Previous Post

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते हैद्रा येथे विविध विकास कामाचें भूमिपुजन

Next Post

माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या उपस्थितीत अनेक बंजारा समाजाचे युवकांचा शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

Admin

Admin

Next Post
माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या उपस्थितीत अनेक बंजारा समाजाचे युवकांचा शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या उपस्थितीत अनेक बंजारा समाजाचे युवकांचा शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697