नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने माजी सैनिकांकडून मानवंदना

नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने यश सिद्धी आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच ,माजी सैनिक संघटना नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमी येथे माजी सैनिक,वीर पत्नी वीरमाता वीर पिता यांच्याकडून सलामी मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन कॅप्टन दत्ता गवई , सुभेदार सतिंदर चावरे तसेच सुभेदार मनोज चव्हाण ,नायब सुभेदार पंजाब पाटील , सुभेदार मेजर राजकुमार मेश्राम, शरद चोरपगार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. याप्रसंगी राज्याध्यक्ष सुभेदार प्रदीप गायकवाड ,राज्य उपाध्यक्ष शिवपुत्र घटकांबळे राज्यविधी सल्लागार राजेंद्र खोब्रागडे राज्य कोषाध्यक्ष श्यामराव भोसले व राज्य प्रवक्ते गजानन इंगळे युद्धवीर लिंबाजी कांबळे सोलापूर जिल्हा संघटक सूर्यकांत गजघाटे पुणे जिल्हा अध्यक्ष सुभेदार संतोष वानखडे पुणे जिल्हा उपाध्यक्ष पोपट आल्हाट तसेच विविध रेजिमेंटचे वीर नारी वीर पत्नी व वीर सैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून सलामी देऊन महार रेजिमेंटचे महार गान करण्यात आले. त्यानंतर सर्व उपस्थिताना संविधानाच्या उद्देशिकाचे सामूहिक वाचन करण्यात आले.



