राजकीय
शिवसेना शेतकरी परिषदेच्या वतीने दुष्काळाबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण करणार – चंद्रकांत पाटील
अक्कलकोट ( प्रतिनिधी )शिवसेना शेतकरी परिषदेच्या वतीने अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळाबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण करणार असल्याची माहिती शिवसेना शेतकरी परिषदेचे राज्य संघटक चंद्रकांत पाटील यांनी दिली.
शिवसेना शेतकरी परिषद, अक्कलकोट च्यावतीने माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे उपस्थितीत जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य व शिवसैनिक कार्यकर्ते व महिला मंडळाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी एकजुटीने आवाज उठविण्याचा निर्धार करण्यात आला. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे. तसेच २०२५ सालचा पिक विमा रक्कम ही शेतकऱ्यांना तातडीने मिळाली पाहिजे. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने शासनाने आर्थिक मदतीचे पॅकेज घोषित करावे अशी मागणी शिवसेना शेतकरी परिषदेचे राज्य संघटक चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात न दिल्यास आमरण उपोषणाचा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.




