राजकीय

अक्कलकोट शहराला नियमित पाणी पुरवठा करा अन्यथा पद मुक्त व्हा , शिवसेनेचे निवेदन

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
     शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा कडून 
अक्कलकोट शहराला नियमित पाणी पुरवठा करा अशी मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
 गेली दोन वर्षं झाली अक्कलकोट शहरातील जनतेला पंधरा ते वीस दिवसानी पाणी पुरवठा केला जात आहे.  म्हणजे च महिन्यात फक्त दोन वेळा आणि वर्षातून विस वेळा पाणी बिल मात्र वर्ष भराच असला अन्याय सहन केला जाणार नाही. पावसाळ्यात अशी परिस्थिती असेल तर येणाऱ्या उन्हाळ्यात काय होणार याचा विचार कराआणि शहारा ला नियमित पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करा अन्यथा शिवसेनाच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना निवेदन देण्यात आले. 
यावेळी जिल्हा प्रमुख शरणराज केंगनाळकर शहर प्रमुख राम जाधव , जिल्हा संघटक सोपान निकते ,महिला आघाडी प्रमुख प्रिया बसवंती , मोहम्मद मुलानी , समीर नदाफ , मुन्ना तांबोळी , शरणपा माळी , रोहित कुमार शंकर वाघमारे ,धनंजय देशपांडे ,श्रीकांत जाधव , गणेश कांबळे , केशटी ,राजेश पाटील , इलाइ सय्यद आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button