राजकीय
अक्कलकोट तालुक्यात शिवसेना ठाकरे पक्षाची ताकद वाढविणार – वसंत देडे

अक्कलकोट ( प्रतिनिधी )शिवसेनेच्या ध्येय धोरणाप्रमाणे ८० टक्के समाजकारण २०% राजकारण यावर भर देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद ही अक्कलकोट शहर तालुक्यासह विधानसभा मतदारसंघात वाढविण्यावर भर देणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना ठाकरे गटाचे नूतन अक्कलकोट तालुका संघटक वसंत देडे यांनी केले.शिवसेना ठाकरे पक्षाच्या अक्कलकोट तालुका संघटक पदी सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष वसंत देडे यांची निवड करण्यात आली.या निवडीबद्दल शिवसेना ठाकरे पक्षाच्या मेळाव्यामध्ये सत्कार करण्यात आला. याप्रसंगीत वसंत देडे हे बोलत होते.शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्याआदेशाप्रमाणे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण यावर शिवसेना पक्षाने भर द्यायला हवा सध्या दुष्काळी परिस्थिती असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना ठाकरे पक्षाने आवाज उठविला पाहिजे. यासाठी पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाची तयारी ठेवली पाहिजे. शेतकरी कष्टकरी त्याचप्रमाणे जे वंचित घटक आहेत त्यांच्या प्रश्नावर व महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याविरोधात शिवसेना ठाकरे पक्ष प्रखरपणे आंदोलन करेल असा इशारा वसंत देडे यांनी दिला.
शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख शरणराज केंगनाळकर यांच्या हस्ते वसंत देडे यांचा सत्कार करण्यात आला.. यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाच्या अक्कलकोट तालुका प्रमुख पदी रवी डोके , तालुका समन्वय बाबुराव राठोड , अक्कलकोट शहर प्रमुख राम जाधव , शहर संघटक महंमद पठाण , शहर समन्वयक गंगाराम धोत्रे , सोशल मीडिया प्रमुख मल्लिनाथ खुबा , जिल्हा संघटक सोपान निकते , जिल्हा समन्वयक आयाज जमादार , विधानसभा प्रमुख श्रीशैल स्वामी , विधानसभा संघटक बाबु राम राठोड ,विधानसभा समन्वयक संतोष पाटील ,उपजिल्हाप्रमुख मनोज पवार ( अक्कलकोट ) ,विश्वजीत चौगुले ( बोरामणी विभाग ) , उपजिल्हा संघटक गुरुनाथ पाटील , उपजिल्हा समन्वयक मृगेंद्र मुंदनकेरी , महंमद पठाण शहर आदी पदाधिकारी उपस्थित होते.



