सामाजिक

सिन्नुर भिमनगरास येणारा मुख्य पाईपला अनधिकृत पणे छिद्र मारून पाणी चोरी 

 
अक्कलकोट ( प्रतिनिधी )   सिन्नुर ता अक्कलकोट संपूर्ण गाव दुष्काळाने होरपळले आहे. उन्हाळा आणखी पुढेच आहे.पण पाणी नसल्याने दुष्काळाची परिस्थिती आहेत.गावात पाण्याची खुप नासाडी होत आहे. सिन्नूर गावात अनेक लोकानी मुख्य पाईप लाईनला छिद्र मारुन त्यांचा त्यांचा घरी स्पेशल पाईपलाईन केलेला आहेत.ते लोक पाण्याची खुप नासाडी करत आहेत.त्यांना विचारल्यावर ग्रामपंचायतचा परवानगी घेतलेला आहेत असे सांगतात.तो ग्रामपंचायतचा नियमानुसार केलेत का अथवा अनधिकृत केले हे ग्रामपंचायतने सर्वे करुन कार्यवाही करण्यात यावे. सिन्नूर भिमनगरला  पाण्यासाठी त्रास होत आहे.टाकीमध्ये पाणीच नसते.मात्र इतर ठिकाणी बसविलेला टाकीमध्ये पाणी खुप असतात.याचे कारण पाणीपुरवठा अधिकार्याला विचारले असता ग्रामसेवकाने दोन दिवसानी पाणी सोडण्यास सांगितलेला आहे असे कर्मचारी सांगतात.भिमनगर येथे असलेल्या पाणी टाकीचा वापर बौध्द समाज, मांग समाज, उजनी समाज, लिंगायत समाज, न्हावी समाजाचे लोक याच पाण्याचा टाकीचा वापर करतात.त्यामुळे या पाण्याचा टाकीला पाणी लवकरच संपतात.दोन दोन दिवस पाण्याची वाट पाहावे बसत आहे.त्यामुळे या पाण्याचा टाकीला पाणी वापरणार्यांची संख्या खुप आहेत.त्यामुळे याला जास्त पाणी सोडण्यात यावे.किंवा दुसरी एक नविन टाकी बांधण्यात यावे.भिमनगरला पाणी कमी पडत आहे.भिमनगर, मांग वस्ती पाणीच नसल्याने नागरिक खुप त्रास सोसत आहेत. याबाबत ग्रामपंचायतीला सांगून सुद्धा कुठलीही कार्यवाही होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.उलट लोक तुम्हीच पाईपला छिद्र मारुन पाणी देण्यास परवनगी दिलेला आहेत.भिमनगर मधील पाण्याची वस्तुस्थिती काय आहे . ते माहित असुन ही परवानगी देणे चुकीचे आहे.तसेच भिमनगरला येणारा मुख्य रस्ता व भिमनगरमध्ये अस्वच्छतेचा प्रमाण वाढलेला आहेत.पुढील प्रमाणे समस्या आहेत.ते लवकरात सोडवण्यात यावे .
 भिमनगरमध्ये असलेला पाण्याची टाकीचा वापर बौध्द समाज, मांग समाज, लिंगायत समाज, उजनी समाज, न्हावी समाज इत्यादी समाजाचा लोक अवलंबुन असल्यामुळे पाण्याची वापर खुप जास्त होतो पण पाणी दोन दिवसाला सोडल्यामुळे पाणी कमी पडतात.ग्रामपंचायतने पाण्याची नवीन टाकी बांधावे अथवा दररोज पाणी पुरवठा करावे.
 भिमनगरला येणारा मुख्य रस्ता भारत स्वातंत्र्य झाल्यापासुन समाजाने  नविन रस्ता, गटार तयार केलेला आहेत.पण त्या रोडला काही लोकानी खडा खोदून पाईपलाईन केलेला आहेत.त्यामुळे ते रोड व गटार खराब झालेला आहेत.ते दुरुस्ती करण्यात यावे.रस्ता स्वच्छ करण्यात यावे.
जलजीवन मिशान अंतर्गात  हर घर नळ करण्यात आलेला आहेत.पण ते सध्या काम बंद आहेत.ते लवकरात लवकार चालू करावे.
 जलजीवन मिशान अंतर्गात समाजातील सर्व रस्ते खराब झालेला आहेत.ते रस्ता तयार करण्यात यावे.
समाजात असलेला हाँलीजन लाईट पुर्ण बंद आहेत.ते चालू करण्यात यावे.
मागील ग्रामसेवक यांनी  डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचा नावाचे  ग्रामपंचायत आँफिसचा अवारात भारतीय संविधानाचे प्रस्तावना बसविण्याचे आश्वासन दिले होते..पण ते अध्याप काम झालेला नाही.
 गावात सर्व ठिकाणी सी.सी.टिव्ही बसविलेले आहेत.पण भिमनगरमध्ये एक पण बसविलेला नाही.भिमनगरमध्ये पण बसविण्यात यावे.
 दलित वस्तीसाठी एक बंधीस्त खोली बांधण्यात यावे.
 सरकारकडून मागासवर्गीय समाजासाठी केलेला सरकारी योजनाचा माहिती व या योजनेचा लाभ लाभार्थीला मिळवून देण्यात सहकार्य करावे.
वरील समस्याचें  निराकरण लवकरात लवकर करण्यात यावे.याबाबत निवेदन ग्रामपंचायत कार्यालय सिन्नुर यांना देण्यात आले. निवेदन ग्रामपंचायत लिपिक शिवपुत्र जेवर्गी यांचाकडे देण्यात आले.यावेळी निवेदन देताना बाळप्पा कांबळे, जयकुमार सोनकांबळे, धर्मा मांग, शिवानंद सोनकांबळे, राम सोनकांबळे, दत्ता कांबळे, सिध्दाराम सोनकांबळे, अंबाराय उजनी, राजू सोनकांबळे, खाजप्पा मांग यांच्यासह ग्रामस्त मोठ्या संख्याने उपास्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button