सांस्कृतिक
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे “सूर आनंदघन” लोकप्रिय मराठी गीतांचा कार्यक्रम संपन्न

अक्कलकोट: (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि न्यासाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त व हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सौ. अलकाताई जनमेजयराजे भोसले व अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त व हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या सचिवा सौ. अर्पिताराजे अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. १४ ऑक्टोबर रोजीच्या दुसऱ्या पुष्पात सावनी रविद्र पुणे प्रस्तुत “सूर आनंदघन” लोकप्रिय मराठी गीतांचा सुरेल मैफिल राष्ट्रीय पुरस्कार व लता मंगेशकर पुरस्कार विजेती पार्श्वगायिका, ऋषिकेश रानडे सुप्रसिद्ध गायक आणि सहकारी, निवेदन दीप्ती भागवत या कार्यक्रमास उपस्थितांनी दाद दिली. जुन्या आणि नव्या पिढीला जोडणारा हा सुरांचा प्रवास प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारा असा कार्यक्रम संपन्न झाला.
सदर कार्यक्रम श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था आणि समस्त हिरकणी सखी महिला यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. सदरचा कार्यक्रम श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ संचलित अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अॅकॅडमी गट नं. ५८१, नवीन वाहनतळ, विरक्त मठाशेजारी अक्कलकोट येथे संपन्न झाला.
दरम्यान श्री तुळजाभवानी माता,श्री समर्थरुपी अन्नपूर्णा माता, राजमाता जिजाऊ, भारतरत्न, गानसम्राज्ञी लतादिदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे व नटराज मूर्तीचे पूजन व दुसऱ्या पुष्पाचे दीपप्रज्वलन मनोरमा सहकारी बँक सोलापूरच्या शोभाताई मोरे यांच्या हस्ते आणि नगरसेविका कस्तुराबाई चौगुले, जाहिराबी शेख, अपर्णाताई सिद्धे, अमृताताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा- अलकाताई जनमेजयराजे भोसले अध्यक्षतेखाली संपन्न झाले. याप्रसंगी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या सचिवा- सौ.अर्पिताराजे अमोलराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, दर्शना लेंगडे-खोबरे, कु.तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले,कु.स्वामिनीराजे अमोलराजे भोसले, दिव्या मोरे, स्मिता कदम, स्वाती निकम, संगीता भोसले, उज्वला भोसले, अंजना पवार, पल्लवी कदम, कोमल क्षिरसागर, रूपा पवार, शितल क्षिरसागर, सुवर्णा घाटगे, कविता वाकडे, छाया पवार, कविता भोसले, अनिता गडदे, निशा बाबर, तृप्ती बाबर, उज्वला भोसले, स्वपना माने, ज्योती शिंदे या हिरकणी सखी महिला यांच्या हस्ते सर्व कलाकारांचा सत्कार श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन करण्यात आला. पुरोहित अप्पू पुजारी मंत्रोच्चारात आरती संपन्न झाली.
सूर आनंदघन- गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांनी मराठी चित्रपटांना संगीत देताना ‘आनंदघन’ या टोपणनावाचा वापर केला होता. त्यामुळे या कार्यक्रमाचे नाव “सूर आनंदधन” असे ठेवण्यात आले असून, यात लतादीदींनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली अजरामर गाणी प्रामुख्याने सादर केली. सदाबहार मराठी गीतांचा नजराणा: या मैफिलीत भावगीते, भक्तीगीते, नाट्यगीते आणि लोकप्रिय मराठी चित्रपट गीतांचा सुंदर मिलाफ ऐकायला मिळाली. सावनी रवींद्र आणि ऋषिकेश रानडे या जोडीची सांगीतिक केमिस्ट्री आणि गाण्यांची उत्कृष्ट निवड यामुळे ही मैफिल प्रत्येक वयोगटातील संगीतप्रेमींसाठी एक उत्तम सांगीतिक पर्वणी ठरली.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष- जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले, न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष- अमोलराजे जनमेजयराजे भोसले, कु.हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, उपाध्यक्ष- अभय खोबरे, सचिव- शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, संतोष भोसले, मेजर श्रीकांत मोरे, संजय गोंडाळ, सागर गोंडाळ, अशपाक काझी, मनोज निकम, अरविंद शिंदे, सौरभ मोरे, रोहित खोबरे, अतिश पवार, प्रशांत शिंदे-साठे, प्रवीण घाटगे,गोटू माने, योगेश पवार , आप्पा हंचाटे, मुन्ना कोल्हे, महांतेश स्वामी यांच्यासह या कार्यक्रमास समस्त विश्वस्त मंडळ, क्रियाशील सदस्य, कार्यकर्ते, व सेवेकरी, अन्नछत्र मंडळाची सहयोगी, हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था, अमोलराजे लेझीम संघ, अमोलराजे भोसले मित्र परिवार आदीजन उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन – श्वेता हुल्ले यांनी केले.



