रिपब्लिकन पक्षाचा ६९ वा वर्धापन दिन सोहळा विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी नवी मुंबई येथे साजरा

वाशी / मुंबई -रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त वाशी,मुंबई येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर वर्धापन दिन केंद्रीय मंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना. रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत,तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य आणि रिपब्लिकन विचारांवर निष्ठा ठेवणारे असंख्य सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित कार्यकर्त्यांच्या उत्साहाने आणि एकजुटीने संपूर्ण नाट्यगृहात रिपब्लिकन चळवळीची ताकद आणि संघटनात्मक ऊर्जा अनुभवायला मिळाली.या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पक्षाच्या विचारांना अधिक बळ देत,सामाजिक न्याय,समता,बंधुता आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी संघटितपणे कार्य करण्याचा संकल्प करण्यात आला.गेल्या ६९ वर्षांत रिपब्लिकन चळवळीने सामाजिक न्याय, संविधानिक हक्क,आरक्षण,समता आणि शोषित-वंचितांच्या प्रश्नांना राजकीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विविध टप्प्यांवर संघर्ष केला.या प्रवासात अनेक नेते, कार्यकर्ते आणि आंबेडकरी विचारांचे हजारो अनुयायी यांनी पक्षाची चळवळ पुढे नेली.
रिपब्लिकन विचारांची ज्योत अशीच प्रज्वलित ठेवत,पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध राहील असा विश्वास आहे.
प्रसंगी महाराष्ट्रातून उपस्थित राहिलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.रामदास आठवले यांनी मार्गदर्शन करत आभार मानले.
या कार्यक्रमाचे आयोजन नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महेश खरे व निरीक्षक व प्रदेश उपाध्यक्ष सिद्राम ओव्हाल यांनी केले.




