सामाजिक

माढ्यात लोकहिताच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या उपोषणाला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा

 

बायोमेट्रिक हजेरी, चारा छावण्या, मनकर्णा नदीत पाणी सोडणे आणि, दुष्काळ निधीच्या मागण्यांसाठी प्रशासनाला साकडे

माढा (प्रतिनिधी) माढा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि, पशुधनाच्या अनेक प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माढा शहरातील स्मशानभूमी येथे संतोष जुगदार, अशोक माने आणि, रामभाऊ पवार यांनी उपोषण सुरू केले आहे. सदरील लोकहिताच्या आंदोलनाला माढा येथील शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख देविदास खरात यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

माढा तालुक्यातील प्रशासकीय कामकाजातील अनियमिततेला आळा घालण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व, कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी सक्तीची करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. तसेच, दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेवून तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात, मनकर्णा नदीमध्ये पाणी सोडून नागरिक व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारा दुष्काळ निधी विनाविलंब वितरित करावा अशा प्रमुख मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.

शेतकरी आणि, सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर प्रशासनाने केवळ आश्वासने न देता ठोस कार्यवाही करणे आवश्यक आहे. प्रशासकीय कार्यालयांतील उपस्थितीची शिस्त, पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता, पाणीटंचाईवरील उपाययोजना आणि, शेतकऱ्यांना आर्थिक मदत अशा बाबींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे अशी भूमिका शिवसेनेचे शहरप्रमुख देविदास खरात यांनी व्यक्त केली.

प्रशासनाने मागण्यांची तातडीने दखल घ्यावी.नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी सुरू असलेल्या सदर उपोषणाची प्रशासनाने तातडीने दखल घेवून संबंधित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी शिवसेना पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. शेतकरी, पशुधन आणि, सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेपर्यंत लोकहिताच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याची भूमिका कायम राहील असेही देविदास खरात यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button