राजकीय
एकरुखचे पाणी २२ वर्षानंतर आले; व्हाट्सअपवर पाणीदार आमदार कसे..?

माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर टीका..
डोंबरजवळगेत युवक आघाडीची स्थापना
अक्कलकोट ( प्रतिनिधी- )सोलापूर जिल्ह्यात पाण्याचे अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत.अशा कठीण परिस्थितीत एकरुख योजनेच्या माध्यमातून कुरनूर धरणात पाणी पोहोचले आहे.ही बाब समाधानाची आहे.या योजनेच्या पूर्णत्वासाठी २२ वर्षे लागली.परंतु आताच आमदार झालेले सचिन कल्याणशेट्टी हे व्हाटस्अपवर पाणीदार आमदार कसे झाले…? हे गुढ कळत नसल्याची टीका माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी डोंबरजवळगे ता.अक्कलकोट येथील कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.
डोंबरजवळगे येथे रविवारी युवक काँग्रेसच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी व्यासपीठावर माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील,केदारनाथ उंबरजे,माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे,कृउबा संचालक सिध्दार्थ गायकवाड,डॉ.उदय म्हेत्रे,
विश्वनाथ भरमशेट्टी,सिध्दाराम भंडारकवठे,सरपंच व्यंकट मोरे,माजी सरपंच दयानंद पवार,हिरामणी नारायणकर,निंगण्णा चिवरे,बशीर जमादार,राम माळगे,अबुजर पटेल,शाकीर पटेल,गजानन जकुकोरे,उमेश माळगे,इरप्पा होटकर,अक्षय गवळी,हर्षदीप गायकवाड आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना म्हेत्रे म्हणाले की,आज अक्कलकोट तालुक्यात सुडाचे राजकारण सुरू झाले आहे.लोकशाहीत प्रत्येकाला स्वातंत्र्य असताना तु इथे का..तु तिथे का बसला..तु त्याच्यासोबत कसा? असे प्रश्न उपस्थित करत सर्वसामान्य लोकांना दमदाटी केली जात असल्याचा आरोप कल्याणशेट्टी यांच्यावर केला.दरम्यान या कार्यक्रमात भाजपाचे गुरु शटगार यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंटी नारायणकर यांनी तर आभार श्रीशैल पाटील यांनी मानले.
चौकट -रस्ता तयार होतो..अन् दुसऱ्याच दिवशी उखडतो-मल्लिकार्जुन पाटील व व्यंकट मोरे
दरम्यान डोंबरजवळगे येथील कार्यक्रमात आपले विचार व्यक्त करत असताना माझी सभापती मल्लिकार्जुन पाटील व सरपंच व्यंकट मोरे यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर टीकास्त्र सोडले.सध्या मतदारसंघात टक्केवारी घेऊन रस्त्याची कामे सुरू असल्याचा आरोप दोघांनी केला. वाढत्या टक्केवारीमुळे ठेकेदार रस्त्याची कामे दर्जाहीन करत आहेत.रस्ता ज्या दिवशी तयार होतो,दुसऱ्याच दिवशी त्या ठिकाणी रस्ता उखडला जातो असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला.



