सामाजिक

गंभीर स्वरूपाच्या गुन्हांच्या शोधासाठी सोशल मीडिया ठरतोय प्रभावी ! 

 

पोलीस प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होतोय प्रभावी वापर !
अक्कलकोट ( प्रतिनिधी  )अक्कलकोट शहर – तालुक्यातील गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या शोधासाठी सध्या सोशल मीडिया प्रभावी ठरत असून पोलीस प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून याचा प्रभावी वापर होत  असल्याने अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस येताना दिसत आहेत. तसेच हरवलेल्या व्यक्तींचा शोध आणि बेवारस मृत व्यक्तींच्या शोधासाठी सोशल मीडियाचा वापर सर्रासपणे होत असून याचा मोठा फायदा हा जनतेला आणि पोलीस प्रशासनास होत आहे .
सध्या सोशल मीडियाचा वापर हा विविध क्षेत्रात केला जात आहे. सोशल मीडियाचा वापर हा जसा चांगल्या कामांसाठी होतोय तसाच तो अनैतिक कामांसाठी होताना दिसत आहे. समाजातील व्यक्ती या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्यक्त होताना दिसत आहेत. फेसबुक , इंस्टाग्राम , व्हाट्सअप ,युट्युब , ट्वीटर यासह विविध सोशल मीडियाच्या माध्यमाचा वापर होत आहे. अक्कलकोट शहर तालुक्यातील विविध गंभीर गुन्ह्यांच्या शोध लावण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. चोरी ,खून यांच्या तपासासाठी पोलीस प्रशासनाकडून सोशल मीडियाचा वापर होत असून अनेक गंभीर गुणांचा छडा लावण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून होत आहे. अक्कलकोट शहरात किरकोळ भांडणाच्या रागातून तरुणाचा खून करून मृतदेह विहिरीत टाकण्यात आला होता. या प्रकरणाचा अक्कलकोट उत्तर पोलिसांनी तपास करून १८ तासात खुनाचा छडा लावला होता. या खुनातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.अक्कलकोट शहरात दिनांक एक ऑगस्ट २०२६ रोजी सागर व्हनचेंजे या युवकाची किरकोळ भांडणाच्या रागातून खून करून त्याचा मृतदेह विहिरीमध्ये टाकण्यात आला होता .सदरचा मृतदेहाच्या ओळखीसाठी सोशल मीडियावर माहिती टाकण्यात आली होती. या माहितीच्या आधारे मयत सागर व्हनचेंजे हा अक्कलकोट तालुक्यातील दहिटणेवाडी येथील असल्याचे निष्पन्न झाले. तसेच मयत सागर व्हनचेंजे याचे दिनांक एक ऑगस्ट २०२६ रोजी अक्कलकोट शहरातील कारंजा चौक येथे आरोपी श्रुती यारोळे , नागनाथ बनसोडे आणि बाळू शिंदे यांच्याबरोबर भांडण झाले होते. या भांडणातूनच सागर व्हंनचेजे याची हत्या करून त्याचा मृतदेह विहिरीमध्ये टाकण्यात आला होता. या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा शोध देखील सोशल मीडियातून माहिती दिल्यानेच तात्काळ लागला आहे.अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी या प्रकरणातील तीन आरोपींना अटक केलेली आहे एकूणच सोशल मीडिया द्वारे माहिती मिळाल्याने या खुनाचा उलगडा होण्यास मदत झाली आहे .
अक्कलकोट शहरातील सामाजिक कार्यकर्ते हे हरवलेल्या व्यक्ती तसेच देवारस मृत व्यक्तींबद्दल माहितीसाठी सोशल मीडियाचा वापर करत आहेत. यामुळे अनेक हरवलेल्या व्यक्तींना तसेच बेवारस मृत व्यक्तींबद्दल त्यांच्या नातेवाईकांना माहिती समजण्यास सोशल मीडियाचा मोठा उपयोग होत आहे. सोशल मीडियामुळे अनेकांना आधार मिळत आहे.सोशल मीडियामळे   दुपारी   घरातून खेळता खेळता निघून गेलेला अक्कलकोट शहरातील महादेव नगर येथील एक चिमुकला सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलेल्या पोस्टमुळे सुखरूप आपल्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचला. सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास यांनी सदरच्या मुलाची फोटोसह पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती.

पोस्ट व्हायरल झाल्यानंतर ही माहिती मुलाच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचली. त्यानंतर मुलाची आई व मामा घटनास्थळी आले आणि खात्री करून सदर मुलाला सुखरूप आईच्या स्वाधीन करण्यात आले.
 एका शेअरमुळे एका आईला तिचा लाडका मुलगा सुखरूप परत मिळाला हाच सोशल मीडियाचा खरा सकारात्मक उपयोग आहे. 
माणुसकी हाच खरा धर्म मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणे मदतीचा हात द्या असा संदेश देण्यात आला. गंभीर स्वरूपांच्या गुन्ह्यातील तपासासाठी पोलीस प्रशासनास जसा सोशल मीडियाचा उपयोग होत आहे तसाच तो सामाजिक कार्यकर्त्यांना समाजसेवा करताना उपयोगाचा ठरत आहे.
चौकट –
अक्कलकोट शहर व परिसरात सोशल मीडियाच्या माध्यमातून हरवलेल्या व मिसिंग व्यक्तींचा शोध, बेवारस व्यक्तींच्या नातेवाईकांचा शोध,बेवारस मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न तसेच हरवलेली महत्त्वाची कागदपत्रे व डॉक्युमेंट्स त्या व्यक्तीपर्यंत  पोहोचविण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे.
एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबापासून हरवली, मिसिंग असताना तिच्या नातेवाईकांना ती सुखरूप सापडणे, किंवा एखाद्या बेवारस व्यक्तीची ओळख पटून तिच्या कुटुंबापर्यंत माहिती पोहोचणे, हाच माझ्यासाठी सर्वात मोठा समाधानाचा क्षण आहे.
एका फोटोला योग्य माहितीची जोड आणि सोशल मीडियाची ताकद मिळाली, तर एखाद्या कुटुंबाला त्यांचा हरवलेला आपला माणूस पुन्हा मिळू शकतो. याच भावनेतून हे सामाजिक कार्य करत आहे आणि पुढे निस्वार्थपणे सुरू ठेवण्याचा माझा प्रयत्न राहील.
माणुसकी हाच खरा धर्म मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणे मदतीचा हात द्या.
सोहेल फरास सामाजिक कार्यकर्ते,अक्कलकोट
सदस्य:रॉबिन हूड आर्मी अक्कलकोट.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button