सोलापूर
कुरनूरसह रामपूर , हणमगाव तलावात पाणी सोडण्याची खासदार प्रणिती शिंदे यांची मागणी

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
एकरूख सिंचन कालावाद्वारे कुरनूर धरण, रामपूर तलाव, हणमगाव तलाव व दुबदुबी तलाव ( शिरवळ ता.दक्षिण सोलापूर) मध्ये पाणी सोडण्याबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
एकरूख सिंचन कालव्यामधून कुरनूर धरण, रामपूर तलाव, हणमगाव तलाव व दुबदुबी तलाव शिरवळ ता.दक्षिण सोलापूर येथील तलावामध्ये पाणी सोडणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच सध्या या परिसरातील शेती, पिण्याचे पाणी व इतर गरजांसाठी पाण्याची कमतरता भासत आहे. सध्या भीमानदीला आलेल्या पुरामुळे नदीचे पाणी कर्नाटक व इतर ठिकाणी वाहून जात असून हे पाणी अडवून एकरूप सिंचन भरून घेऊन एकरूप सिंचन कालावाद्वारे कुरनूर धरण, रामपूर तलाव, हणमगाव तलाव व दुबदुबी तलाव ( शिरवळ ता.दक्षिण सोलापूर ) भरून घेतल्यास या भागातील नागरिक व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.
तरी एकरूख सिंचन कालावाद्वारे कुरनूर धरण, रामपूर तलाव, हणमगाव तलाव व दुबदुबी तलाव ( शिरवळ ता.दक्षिण सोलापूर) मध्ये तातडीने पाणी सोडण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावे अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनद्वारे केली आहे..




