सामाजिक

गुरुपौर्णिमेनिमित्त राबविलेल्या बंदोबस्त बद्दल पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णींचा वटवृक्ष मंदिरात सन्मान.

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) – गुरुपौर्णिमेनिमीत्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरासह अक्कलकोट शहरात उत्कृष्टरित्या नियोजन करून भाविकांच्या सोयीसाठी राबवलेल्या पोलीस बंदोबस्त निमित्त सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व सहकाऱ्यांचा श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला. 
         आज पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन स्वामींचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांनी स्वामींचे कृपावस्त्र व प्रसाद देऊन अतुल कुलकर्णी यांचा हा सन्मान केला. याप्रसंगी अक्कलकोटचे पोलीस उपअधीक्षक विलास यामावार, साऊथ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी, नॉर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांचाही स्वामींचे कृपावस्त्र व प्रसाद देऊन महेश इंगळे यांनी या प्रसंगी सन्मान केला. याप्रसंगी बोलताना पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पोलीस बंदोबस्तच्या माध्यमातून स्वामी दर्शना करीता आलेल्या भाविकांची सेवा करण्याची संधी मिळाल्याने व मिळालेली संधी सुरळीत पार पडल्याने समाधान लाभले असल्याचे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, गोपनीय खात्याचे धनराज शिंदे, गजानन शिंदे, श्रीशैल गवंडी, विपुल जाधव, श्रीकांत मलवे आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button