“राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आपल्या दारी अभियान” प्रभावीपणे राबविणार – अण्णासाहेब कटारे

नाशिक:- राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक नाशिक येथे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. “राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आपल्या दारी” अभियान राबविणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी बोलताना सांगितले.
गाव तिथे शाखा निर्माण करून रिपब्लिकन चळवळ गतिमान करण्यासाठी गाव, शहर,तालुका पातळीवर कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असेही कटारे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले.
“समाज जोडो अभियान”
” आम्ही रिपब्लिकन अभियान”
घेऊन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे समस्त नेते कार्यकर्ते सर्व समाज घटकांना सोबत घेऊन खऱ्या अर्थाने रिपब्लिकन चळवळ मजबूत करण्यासाठी अहो रात्र प्रयत्न करीत आहेत.
रिपब्लिकन पक्षाच्या नावाने काही स्वार्थी नेते नेहमीच प्रस्थापित पक्षांच्या दारात कटोरा घेऊन भिकेची याचना करतांना वारंवार बघावयास मिळत आहे ही अत्यंत खेदजनक अशीच बाब आहे.
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात महाराष्ट्र राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते महिला युवक युवती दाखल होत आहेत.
*रिपब्लिकन पक्षाला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर दादासाहेब गायकवाड* यांच्या काळातील गतवैभव पक्षाला प्राप्त करून देण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने कंबर कसली आहे असे ही अण्णासाहेब कटारे यांनी शेवटी बोलतांना सांगितले.
नाशिक येथील बैठकीस जिल्हा नेते दिलीप प्रधान, जिल्हा उपाध्यक्ष पंढरीनाथ आव्हाड, युवा नेतृत्व महाराष्ट्र बिपिन कटारे,नाशिक जिल्हा नेते मनोहर दोंदे,नाशिक युवा जिल्हाध्यक्ष जितू बागुल,नाशिक जिल्हा नेते संजय तुपसुंदर,नाशिक शहर उपाध्यक्ष प्रशांत भाऊ,महिला आघाडी नेत्या मीना भालेराव, नाशिक युवा तालुका अध्यक्ष किरण गायकवाड, नाशिक महानगर संघटक सागर जाधव, पंचवटी अध्यक्ष गौतम दोंदे, पंचवटी युवा आघाडी हेमंत आहेर, दिंडोरी युवा नेते राहुल शार्दुल, समाधान सोनवणे, प्रशांत कटारे,सातपूर आकाश आव्हाड,नाशिकरोड राजेंद्र भालेराव,जुना नाशिक शकील शेख, उपनगर किरण खडताळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.