राजकीय
अक्कलकोट येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ची बैठक संपन्न

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)
प्रदेशअध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वाखाली
२६ जुलै २०२६ रोजी सोलापुरात होणाऱ्या आंदोलनाच्या संदर्भात अक्कलकोट तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) सोलापूर पक्षाच्या वतीने आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात रविवार,दि. २६ रोजी सोलापुरात भव्य निदर्शने आंदोलन आयोजित करण्यात आले आहे,या आंदोलनाच्या नियोजनासाठी बुधवार
दि. २२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता मैंदरगी रोड भक्त निवास येथे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली,
ही बैठक अविनाश मडिखांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहर अध्यक्ष अजय मुकणार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.बैठकीच्या प्रारंभी भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली,
या बैठकीत तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य निदर्शनामागील कारणे स्पष्ट केली तसेच या आंदोलनाचे सामाजिक व संवैधानिक महत्त्व कार्यकर्त्यांना समजावून सांगितले व सर्व कार्यकर्त्यांना एकजुटीने सहभागी होण्याचे आवाहन केले,
यावेळी बैठकीचे अध्यक्ष अजय मुकणार यांनी आंदोलन विषयी सविस्तर अशी माहिती आपली मते,सूचना व मनोगते व्यक्त केले. यावेळी जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष सैदाप्पा झळकी, सुरज सोनके, तालुका सरचिटणीस राजू भगळे, शहर सरचिटणीस शुभम मडिखांबे,तमा धसाडे,सचिन बर्गली,व इतर पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.आगामी आंदोलन यशस्वी करण्यासाठी संघटनात्मक नियोजन,जनजागृती व कार्यकर्त्यांच्या सहभागा बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली,
सदर बैठकीस तालुका उपाध्यक्ष अंबादास गायकवाड,रमेश बनसोडे,चंद्रकांत गायकवाड,युवक तालुकाध्यक्ष आप्पा भालेराव,राजू बोरगाव,नितेश मडिखांबे,विलास गायकवाड,चंद्रकांत गायकवाड,रमेश धोडमणी,राजू वाघमारे,दिनेश रुही,गोरख धोडमणी,निगराज निबाळ,राजू कांबळे,आकाश शिंगे,हणमंत कांबळे,शिवलिंग शिंगे,कृष्णा धोडमणी,बसू गुंगरेगाव,कटप्पा म्हणूरे,जयकुमार सोनकांबळे,राजू गवळी,महादेव बनसोडे प्रमुख सदस्य,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे सुत्रसंचलन विजय पोतेनवरू यांनी केले. 




