धार्मिक
श्री क्षेत्र पंढरपूर पुनर्वसन धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी
३ हजार ९९३ कोटी ९० लाख रुपयांच्या विकासकामांना गती मिळणार…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या विकासाला गती देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये श्री क्षेत्र पंढरपूर येथील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी देण्यात आली असून, विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर व वाणिज्य संकुल आराखड्यातील ३ हजार ९९३ कोटी ९० लाख रुपयांच्या विकासकामांना गती मिळणार आहे. वारकरी भाविकांची संख्या, धार्मिक महत्त्व आणि प्रकल्पाची तातडीची गरज लक्षात घेऊन प्रकल्पबाधितांसाठी विशेष पॅकेज देण्याच्या सूचनेनुसार हे धोरण तयार करण्यात आले आहे.



