धार्मिक

 श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात तहसीलदार- विनायक मगर  यांच्या हस्ते पूजा संपन्न 

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत न्यासाच्या श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात मंगळवारी सायंकाळी ७ वा. तहसीलदार- विनायक मगर, अक्कलकोट यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली.
या प्रसंगी न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते तहसीलदार विनायक मगर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे सचिव शामराव मोरे काका उपस्थित होते.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथील शमीवृक्षाखाली गेल्या ३३ वर्षा पूर्वी श्री गणेशाची स्थापना करून सुंदर असे मंदिर व सभामंडप बांधण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थांच्या पावन भूमीवर श्री शमीविघ्नेश गणेश असल्याने त्याचे स्थान व महात्म्य अलौकिक आहे.
याप्रसंगी रामचंद्रराव घाटगे, रोहित खोबरे, पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, सोमकांत कुलकर्णी, विश्वंभर पुजारी, प्रा.शरणप्पा अचलेर, मुख्य आचारी बाळासाहेब पोळ, धानप्पा उमदी,  मुख्य सुरक्षा रक्षक महादेव अनगले, सनी सोनटक्के, गोटू माने, प्रवीण देशमुख, अतिश पवार, विलास देशमुख, रोहन शिर्के, बाबुशा महिंद्रकर, अनिल गवळी, प्रविण घाटगे,  अप्पा हंचाटे, प्रसाद हुल्ले, अनिल बिराजदार, गणेश पाटील, सिध्दाराम कल्याणी, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, रमेश हेगडे, तानाजी पाटील, राजू पवार, एस.के. स्वामी, विलासराव रेड्डी, शुभम सावंत, स्वामिनाथ मलवे, ज्ञानेश्वर भोसले, दत्ता मोरे, सुमित घाटगे, ओंकार देशमुख, मुन्ना कोल्हे, भारत पाटील, किरण साठे, अमर मसरे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
चौकट :
श्री गणेश अथर्वशीर्ष पठण-
रविवार दि.२०सप्टेंबर २०२६ रोजी महिलांचे सामुदायिक  श्री गणेश अथर्वशीर्ष पठण सायंकाळी ५ वाजता होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button