सामाजिक

शेटफळ येथे मागासवर्गीय वस्तीवर हल्ला , वंचित बहुजन आघाडीचे पोलीस प्रशासनास निवेदन

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथे
मागासवर्गीय वस्तीवर जातीवादी विचाराच्या लोकानी हल्ला केल्या प्रकरणी सोलापूर जिल्ह्याचे 
ॲडिशनल एसपी  विजय कबाडे  यांना वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने फरार आरोपी तात्काळ अटक करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले .
शेटफळ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी बौद्ध व मातंग समाजावर मनुवादी विचारसरणी, जातीवादी गाव गुंडानी जमाव जमवून हल्ला केल्याच्या प्रकरणात वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर कमिटीच्या वतीने संबंधित पीडित लोकांची विचारपूस करून तसेच सर्व रुग्णांना  छत्रपती शिवाजी महाराज प्रथम उपचार केंद्र सोलापूर (सिव्हिल हॉस्पिटल) येथे उपचारास मदत करण्यात आली. तसेच संबंधित आरोपी यांना  अटक करण्याची मागणी वंचित आघाडी तर्फे करण्यात आली. याबाबत अडिशनल एसपी विजय कबाडे यांची भेट घेऊन आरोपीना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.  तसेच शेटफळ या ठिकाणी जाऊन गावातील सर्व बाल तरुण माता भगिनी  यांची विचारपूस करून सर्वांना धीर देऊन सदैव वंचित बहुजन आघाडी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आम्ही बौद्ध समाज व मातंग समाजाच्या बाजूने आहे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांनी केले. सोलापूर येथे निवेदन देताना जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे , शहराध्यक्ष प्रशांत गोनेवार ,जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे, सोलापूर शहर महासचिव विनोद इंगळे ,युवा आघाडी शहराध्यक्ष महेश जाधव, युवा महासचिव नरेंद्र शिंदे मोहोळ तालुका अध्यक्ष धीरज कसबे , रवी थोरात (जि. उपाध्यक्ष) युवा नेते सुहास  सावंत, अक्कलकोट नेते यशवंत इंगळे , चांद सुरवसे, विजयानंद उघडे, जालिंदर  चंदनशिवे, नरेंद्र शिंदे, अमोल दुर्के ,शरीफ शेख, मल्लिकार्जुन हिरेमठ , पुष्पा गायकवाड सह
अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button