सामाजिक
आजच्या काळातही गांधीजींचे विचार तितकेच प्रासंगिक आहेत – महेश इंगळे

स्विमिंग ग्रुपच्या वतीने महात्मा गांधी जयंती उत्साहात संपन्न.
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
महात्मा गांधीजींनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. गांधीजींचे विचार आपण सर्वांनी अंगीकारले पाहिजेत कारण आजच्या काळातही गांधीजींचे विचार तितकेच प्रासंगिक आहेत असे गौरवोद्गार येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन – नगरसेवक तथा स्विमींग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष महेश इंगळे यांनी काढले.
आज गांधी जयंती निमीत्त येथील स्विमींग ग्रुपच्या वतीने महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक तथा स्विमींग ग्रुपचे संस्थापक महेश इंगळे यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना महेश इंगळे यांनी वरील भावोद्गार काढले.
महेश इंगळे पुढे म्हणाले की
महात्मा गांधीजींच्या अहिंसा तत्त्वाचा अंगीकार सर्वांनी करावा. स्विमिंग ग्रुपच्या माध्यमातून आम्ही दररोज व्यायामा सोबतच एकोपा आणि सामाजिक बांधिलकी जपतो. हाच खरा गांधी विचार असल्याचे मनोगतही व्यक्त करून सर्वांना गांधी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्याधर गुरव सर यांनी केले तर आभार विश्वनाथ देवरमणी सर यांनी मानले.
याप्रसंगी प्रथमेश इंगळे, संतोष पराणे , सचिन किरनळी, विश्वनाथ देवरमणी , बाळासाहेब एकबोटे, बाबा सुरवसे, विद्याधर गुरव , कल्याणी गंगोंडा , माणिक माशाळे, रफिक पठाण, अंकुश केत, रमेश कणबसे, सुनील पवार, रमेश शिंदे, सिद्धाराम बिडवे, चंद्रकांत सोनटक्के, मेजर अमोल माने, कुशाल गंगोंडा, किरण गंगोंडा, आदित्य कणबसे यांच्यासह
स्विमिंग ग्रुपचे सर्व सदस्य व महेश इंगळे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.



