धार्मिक
अक्कलकोट येथे लोकमान्य गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाची जल्लोषात प्रतिष्ठापना

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट शहरातील जुना आडत बाजार येथे लोकमान्य गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणरायाच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. म.नि.प्र. बसवलिंगेश्वर महाराज तसेच श्री ष.ब्र. जयगुरुशांतलिंगेश्वर शिवाचार्य महाराज , आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत प्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला.
यावेळी वेदपठण व भक्तिमय गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी श्री गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.
यावेळी अक्कलकोट नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, कृषी सभापती सोलापूर जिल्हा परिषद . रामप्पा चिवडशेट्टी, पंचायत समिती उपसभापती सागर कल्याणशेट्टी, भाजपा मध्य मंडल अध्यक्ष . प्रदीप पाटील, भाजपा उत्तर मंडल अध्यक्ष अमोल हिप्परगे, जि.प. सदस्य . विकास बुळ्ळा, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती . सिद्धाराम बाके, उपनगराध्यक्ष . ऋतुराज राठोड, आरोग्य सभापती . अविनाश मडीखांबे, प्रदेश भाजपा कार्यकारी सदस्य . शिवशरण जोजन, . मोतीराम राठोड, करजगी सरपंच. विवेकानंद उबरजे, नगरसेवक प्रवीण शहा, भीमराव शेळके, लक्ष्मीकांत धनशेट्टी, अशोक जाधव, सद्दाम शेरीकर, संजय घोडके, नगरसेविका श्रीमती अपर्णा सिद्धे, . विक्रम शिंदे, सुनील सिद्धे, . मल्लिकार्जुन मसुती, . विलास कोरे, . मल्लिकार्जुन आळगी, . अंकुश चौगुले यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.



