राजकीय
बादोल्यात रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा ५८ हजार रुपयांचा नोटाचा हार घालून अनोखा वाढदिवस साजरा

अक्कलकोट ( प्रतिनिधी ):- राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे माजी मंत्री राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त मौजे बादोले बु. येथे भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन राष्ट्रीय समाज पक्षाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर यांनी केले होते. यावेळी महादेव जानकर यांना ५८ हजार रुपये नोटांचा हार घालून पक्षनिधी देऊन शुभेच्छा देण्यात आले. यावेळी सोलापुर जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आनंद तानवडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव माऊली सलगर, महाराष्ट्र प्रदेश युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजितकुमार पाटील, सोलापूर जिल्हा अध्यक्ष अनिल शेंडगे, सोलापूर शहर अध्यक्ष सतीश बुजुरके, अक्कलकोट तालूका अध्यक्ष दत्तात्रय माडकर, युवा नेते काकासाहेब पाटील, शिरवळचे माजी सरपंच बसवराज तानवडे, रासपचे अक्कलकोट तालुका संघटक गुणवंत लवटे, तालुका सरचिटणीस रविनाथ सलगरे, उपाध्यक्ष रेवणसिध्द शेरी, भिमाशंकर बंदिछोडे, बादोल्याचे माजी सरपंच बाजीराव खरात, गौरीशंकर गायकवाड, विठ्ठल खरात, बसवंत धायगोडे, शिवशंकर कत्ते, शांतकुमार सलगरे, अप्पुशा पाटील, रतनकुमार बिराजदार, मशिद शेख, लक्ष्मण धायगोडे, बडेसाब शेख, लाला नदाफ, पांडुरंग सलगरे, महेश सोलंकर, तानाजी सोलंकर, सिध्दाराम सलगरे, तुळशीराम माडकर यांच्या सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना जानकर म्हणाले की गोपीनाथ मुंडे यांच्या मुळे आम्ही एनडीए मध्ये सामिल झालो होतो पण सध्या भाजप असली नेत्यांना बाजूला सारून नकली नेत्यांना जवळ करत आहेत. परवा आम्ही कोकणातील आंबा व काजू उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी दोन ते पाच लाख रुपये अनुदान मिळण्यासाठी मी आणि राजू शेट्टी तसेच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आंदोलन करीत असताना आम्हाला जेलमध्ये घालण्यात आले. शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली पाहिजे या मागणीसाठी नागपूर मध्ये बच्चू कडू आणि मी आंदोलन केले. त्यावेळी पण सरकारने आम्हाला अटक करुन जेलमध्ये पाठवले. आंदोलन करणे म्हणजे गुन्हा आहे की काय हेच समजायला तयार नाही. म्हणून सर्वांनी ठरवले पाहिजे की शेतकर्यांच्या बाजूला उभा न राहणाऱ्या सरकारला कायमचे घरी पाठविण्यासाठी आम्ही दिवस रात्र फिरत आहोत. ज्यांना आम्ही सत्तेवर आणले तेच आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाला चार राज्यात महाराष्ट्र कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेश याठिकाणी मान्यता मिळाली आहे. आणखी दोन राज्यात मान्यता मिळाली तर राष्ट्रीय समाज पक्ष हा राष्ट्रीय पक्ष होणार आहे. राष्ट्रीय समाज पक्ष मोठा करण्यासाठी गोरगरीब जनता तन,मन, धन देऊन सहकार्य करीत आहात म्हणून पक्षाची वाटचाल जोरात चालू आहे. आज बादोल्यात वाढदिवसाच्या निमित्ताने पक्षनिधी म्हणून नोटांचा हार घालून अभिष्टचिंतन केले. हा ४० वा हार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या बाबासाहेब तानवडे घराण्यांनी या तालुक्यात भाजप वाढविण्यासाठी जीवाचे रान केले त्या कुटुंबातील मुलाला तिकिट मिळत नाही हे दुर्दैव असल्याचे त्यांनी सांगितले. येणारा दिवस आपले असल्याचे सांगताना त्यांनी तुम्ही जनतेच्या दारात जावा जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा. तानवडे परिवारासोबत मी सदैव खंबीरपणे पाठीशी उभे असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्यात सध्या परिवर्तनाची गरज असल्याने नक्कीच बदल घडल्याशिवाय राहणार नाही. आम्ही जिकडे राहू तिकडे सत्ता राहील असे सांगताना राष्ट्रीय समाज पक्षाला आपण पक्षनिधीसाठी मदत केलात यापुढे तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर यालाही आपण सहकार्य करावे असे आवाहन जानकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिध्दार्थ भडखुंबे यांनी केले तर आभार प्रदर्शन गुणवंत लवटे यांनी केले.



