सामाजिक

अक्कलकोट नगरपरिषदेचा प्रत्येक गुरुवारी ‘नो व्हेईकल डे’ साठी झाला निर्णय ; नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचा संयुक्त निर्णय 

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) अक्कलकोट नगरपरिषदेच्या वतीने एक चांगला निर्णय आज घेण्यात आला असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षित भविष्याच्या आणि काटकसरीच्या 
धोरणांचा आवाहनाचा विचार करून येत्या गुरुवारपासून नगराध्यक्ष,नगरसेवक आणि कर्मचारी यांच्यासाठी प्रत्येक गुरुवारी ‘नो व्हेयिकल डे ‘ पाळण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ही माहिती अक्कलकोटच्या नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे. इंधनाची बचत करणे हा ‘नो व्हेयीकल डे ‘ याचा मुख्य उद्देश असला तरी त्याला अनेक महत्त्वाचे आणि उपयुक्त असे कारणे लागू होतात याचा विचार करून येत्या गुरुवार तारीख 21 मे 2026 पासून अक्कलकोट नगरपालिकेचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक मुख्याधिकारी आणि नगरपरिषदेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी सदर ‘नो व्हेईकल डे’ चा अंमल लागू होणार असून तो यापुढे प्रत्येक गुरुवारी पाळला जाणार आहे. या निर्णयाचा लाभ जरी मर्यादित क्षेत्रासाठी असला तरी तो दीर्घकालीन असल्याने त्याचे चांगले फायदे येत्या काळात पहावयास मिळणार आहेत. ‘नो व्हेईकल डे’ चा मुख्य उद्देश हा वायू प्रदूषण कमी होते.एक दिवस वाहनांचा वापर कमी केल्याने पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी होऊन आर्थिक बचत होते, तसेच देशाच्या इंधन साठ्यावर ताण कमी होतो,वाहतूक कोंडी कमी होते.या सर्व कारणासाठी उपयुक्त ठरावा यासाठी अमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचे सकारात्मक पालन करून एक जागरूक नागरिक म्हणून खारीचा वाटा उचलण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
 प्रतिक्रिया 
मिलन कल्याण शेट्टी 
नगराध्यक्ष,अक्कलकोट 
अक्कलकोट नगरपरिषदेने घेतलेला ‘नो व्हेयिकल डे ‘हा दूरगामी परिणाम करणारा महत्त्वाचा निर्णय असून 
 हा केवळ एक दिवस पाळले जाणे यासाठी नसून स्वच्छ पर्यावरण, चांगले आरोग्य आणि सुरक्षित भविष्यासाठी महत्त्वाची सामाजिक चळवळ आहे.शहरवासियांनी दर गुरुवारी या मोहिमेत आपल्या उज्वल भविष्यासाठी शक्य त्यांनी या अडचणीच्या काळात सहभागी होऊन सहकार्य करावे हे आवाहन वजा विनंती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button