मोहोळ येथे प्रश्नपत्रिका फुटींविरोधात युवक काँग्रेसचा भव्य मशाल मोर्चा…

मोहोळ (प्रतिनिधी )
देशात आणि राज्यात विविध प्रवेश परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या गंभीर प्रकरणांच्या निषेधार्थ काल रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्यातर्फे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे एका भव्य अशा मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूर ग्रामीण (पूर्व) जिल्हा युवक काँग्रेस कमिटी, सोलापूर ग्रामीण (पश्चिम) जिल्हा युवक काँग्रेस कमिटी आणि, सोलापूर (शहर) जिल्हा युवक काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने कालचा हा मशाल मोर्चा संपन्न झाला.
आज संध्याकाळी मोहोळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून तहसील कार्यालय इथपर्यंत काढण्यात आलेल्या सदर मशाल मोर्चामध्ये युवक काँग्रेस संगठनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, विद्यार्थी तसेच; नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस तथा सोलापूर ग्रामीण जिल्हा प्रभारी प्राची ताकतोडे तसेच, प्रदेश सचिव तथा जिल्हा सहप्रभारी पंकज पोळ आणि, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी सुरेश हावळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कालचा हा भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला होता.
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली व, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आलेल्या ह्या मशाल मोर्चामध्ये विविध प्रकारच्या प्रवेश परीक्षांतील गैरप्रकारांविरोधात तीव्र स्वरूपात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच, यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी याठिकाणी उपस्थित राहिलेल्या शेकडो कार्यकर्ते/पदाधिकारी व आंदोलनकर्ते यांच्याकडून करण्यात आली.
याप्रसंगी देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच, प्रवेश परीक्षांच्या प्रक्रियेत पारदर्शकता राखावी अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. सदरील मशाल मोर्चानंतर येथील संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना एक निवेदन देऊन विविध प्रवेश परीक्षांतील घोटाळ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी तसेच, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी प्रमुख मागणी जिल्हा युवक काँग्रेस कमिटी यांच्यावतीने करण्यात आली.
कालच्या मशाल मोर्चासाठी सोशल मीडिया विभागाचे राज्य समन्वयक सचिन खैरे-पाटील, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष जहीर मणेर, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा अंजली वस्त्रे, महिला शहराध्यक्षा अंजली मोहिते, माजी तालुकाध्यक्षा रतन कसबे, युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सागर राठोड, जिल्हा उपाध्यक्ष शाहुराजे जगताप व प्रा.निलेश गायकवाड, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज ढवण, सोशल मीडिया विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष देविदास गायकवाड, सोशल मीडिया विभागाचे तालुकाध्यक्ष अविनाश कांबळे, युवक काँग्रेसचे मोहोळ विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष प्रा.चेतन पाटील, जिल्हा समन्वयक सुर्यकांत लोंढे, अल्पसंख्यांक विभागाचे माढा तालुका उपाध्यक्ष जमीर सय्यद, कुमार गोडसे, प्रविण साळवे, सुनिल टिळेकर, नानासाहेब मोरे, हरीभाऊ गायकवाड, राजेंद्र मोटे, केराप्पा घाडगे, कृष्णा खंदारे, चेतन पाटील, राहुल सुरवसे, आनंद गजघाटे, अरुण पवार, आदी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित राहिले होते.



