सामाजिक

जावेद पटेल ‘दिव्य रत्न’ पुरस्काराने सन्मानित

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
नागनळळी येथील  आश्रम शाळेचे सचिव तथा शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टीचे नेतृत्व असलेले  जावेद पटेल यांना दैनिक दिव्य मराठीच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित ‘दिव्य रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले. समाजात उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांच्या सन्मानार्थ दिला जाणारा हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
हा सन्मान महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री  जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष . ललित गांधी तसेच दिव्य मराठी सोलापूरचे निवासी संपादक महेश रामदासी, युनिट हेड हाजी मलंग शेख यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शहरांप्रमाणे दर्जेदार व आधुनिक शिक्षण मिळावे, या उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन . जावेद पटेल यांनी सुसज्ज, संस्कारक्षम व आदर्श आश्रम शाळेची निर्मिती केली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी उभारलेल्या शैक्षणिक सुविधा, आधुनिक उपक्रम आणि शिक्षणाबद्दलची त्यांची तळमळ समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
शिक्षण, समाजसेवा आणि ग्रामीण विकास या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना प्रदान करण्यात आलेला ‘दिव्य रत्न’ पुरस्कार हा संपूर्ण नागनळळी व अक्कलकोट परिसरासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्याला भविष्यातही अशीच उज्ज्वल यशाची किनार लाभो, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button