राजकीय
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतांना अक्कलकोट तीर्थक्षेत्रसाठी ३८२ कोटीची निधी – शंकर म्हेत्रे

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
शिवसेनेचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकासकामासाठी३८२ आणि पाणीपुरवठ्यासाठी ७२ कोटींची निधी दिली.सध्या चालू असणारे सर्व विकास कामे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मंजूर झालेल्या निधीतून करण्यात येत आहे.असे सलगर जिल्हा परिषद गटातील उमेदवार शिवराज म्हेत्रे
यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे नेते शंकर म्हेत्रे यांनी बोलताना म्हणाले.
सलगर जिल्हा परिषद गट व गटातील हाळहळ्ळी मै,बिंजगेर,संगोळगी,तळेवाड,रु ददेवाडी,आंदेवाडी,चिंचोली मै,इब्रामपुर व चिक्केहळळी आदी गावामध्ये होम टू होम प्रचार व पदयात्रा काढण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी माजी पंचायत समिती सभापती –
दुधनी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे,नूतन नगरसेवक बसवराज हौदे,माजी जि.प सदस्य शिवानंद बिराजदार उपस्थित होते.
पुढे बोलताना शिवसेनेचे नेते शंकर म्हेत्रे म्हणाले की,आम्ही सत्तेमध्ये असताना माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या माध्यमातून शहर व तालुक्यात सर्वात जास्त विकास कामे केले.अंतर्गत रस्ते पिण्याच्या पाण्याची योजना,अंगणवाडी इमारत,शाळा उजनी धरणाचे पाणी,प्रत्येक गावात सभामंडप अशा अनेक प्रचंड विकास कामे केले.मात्र कधीही त्या कामाची प्रसिद्धी मिळवली नाही.तसेच सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन तालुक्याचा विकास कामे करणार आहे.
सिद्धाराम म्हेत्रे सत्तेत असताना पदाचा दुरुपयोग कधीच केला नाही.विरोधी पक्षांच्या सरपंच यांना निधी देण्यासाठी मागेपुढे पाहिले नाही.सत्ताधारी व विरोधकांना सोबत घेऊन तालुक्याचा विकास कामे केला,हिच आमची खरी ओळख.लोक स्वार्थासाठी निवडणुक लढवत आहेत.तर आम्ही जनतेच्या भल्यासाठी लढत आहोत.तसेच सत्तेमध्ये असताना सलगर गटाला झुकते माप दिले आहे.एवढ्या वर्षात कधीच आम्ही घरात उमेदवारी दिली नव्हती.परंतु यावेळी सलगर जिल्हा परिषद व तुरनूर पंचायत समिती गणात उमेदवारी दिली आहे.दिलेले उमेदवार
उच्चशिक्षित असल्याने ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यास अडचणी भासणार नाहीत.आपण सर्वांनी एकजुटीने शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या
पाच वर्ष तुमच्या सेवेत राहतील असे आवाहन शिवसेनेचे नेते शंकर म्हेत्रे यांनी बोलताना म्हणाले.




