राजकीय
नागणसूर गावचे उपकार कधीच विसरणार नाही – आमदार सचिन कल्याणशेट्टी

अक्कलकोट ( प्रतिनिधी )नागणसूर हे गाव माझ्या आईचे गाव असून या गावाने मला विधानसभेच्या दोन निवडणुकांमध्ये भरघोस असे मताधिक्य दिले आहे. या गावाचे उपकार मी या जन्मात तरी विसरणार नाही. या गावासाठी मी असे काम करणार आहे ते काम कायम नागाणूसुरातील नागरिकांच्या स्मरणात राहील असे काम मी करणार आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत नागणसूर भागाच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी नागणसूर येथील जाहीर सभेत केले.अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथे सायंकाळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची जाहीर सभा पार पडली.
याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नागणसूर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार . सिद्धाराम निळकंठ शिवमूर्ती, नागणसूर पंचायत समिती गणाच्या उमेदवार वैष्णवी विरभद्र सलगरे, तसेच तोळनूर पंचायत समिती गणाच्या उमेदवार . सविता रमेश सोलंकर ,गिरमल गंगोंडा, मलकण्णा कोगनूर मल्लिकार्जुन भासगी, रमेश सोलंकर, प्रकाश प्रचंडे, बाबासाहेब पाटील, आनंद बुक्कानुरे, . अप्पू परमशेट्टी, रमेश उप्पीन, अप्पू कविटगीमठ, वीरभद्र सलगरे, शंकर पाटील, महेश पाटील, नगरसेवक कांतू धनशेट्टी, सिद्धाराम तोळनूरे, काशिनाथ प्रचंडे, संतोष आळगी, . महादेव बडूरे, . दिलीप यमगार, बसवराज मटगी, ओम गंगोंडा आदीचीं प्रमुख उपस्थिती होती.
या सभेत उपस्थित नागरिकांना भाजपा उमेदवारांच्या विकासात्मक कार्याची माहिती देऊन येत्या निवडणुकीत मतदानरुपी आशीर्वाद देण्याचे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
भारतीय जनता पक्षाचे . सिद्धाराम निळकंठ शिवमूर्ती, सौ. वैष्णवी विरभद्र सलगरे आणि सौ. सविता रमेश सोलंकर हे उमेदवार स्थानिक लोकांच्या समस्या समजून भाजपा महायुती सरकारच्या माध्यमातून तात्काळ सोडवण्यासाठी कटिबद्ध आहेत. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या विकासात्मक दृष्टीकोनावर विश्वास ठेवून, येत्या ७ फेब्रुवारीला सर्व उमेदवारांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून बहुमताने विजयी करण्याचे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.या जाहीर सभेला नागणसूरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




