Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अतिवृष्टीमुळे अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी उध्वस्त

Admin by Admin
September 22, 2025
in टॉप न्यूज
0
अतिवृष्टीमुळे अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी उध्वस्त
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 शासनाकडून भरीव आर्थिक मदतीची अपेक्षा !

अक्कलकोट ( प्रतिनिधी )अतिवृष्टीमुळे अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी उध्वस्त झाला आहे.अक्कलकोट तालुक्यातील अतिवृष्टी बाधित क्षेत्राचे पाहणे नामदार , खासदार , आमदार यांच्याकडून करण्यात आली. अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या बळीराजाला शासनाकडून भरीव आर्थिक मदतीसाठी मंत्री महोदय , खासदार ,आमदार यांनी प्रयत्न करावा अशी मागणी अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी बांधवातून केली जात आहे. आता अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या बळीराजाला  शासनाकडून मदतीची अपेक्षा वाढली आहे.

 अक्कलकोट तालुक्याला गेल्या महिनाभरापासून पावसाने झोडपून काढले आहे.अक्कलकोट तालुक्यातील आठ मंडळांमध्ये प्रचंड असा पाऊस झाला असून अतिवृष्टी झाली आहे.
 अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे प्रचंड असे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील तूर मूग उडीद सोयाबीन तसेच कांदा, ऊस यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अक्कलकोट तालुक्यातील जवळपास ५० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतीमध्ये पाणी थांबल्याने शेतातील पिके करपून गेली आहेत. यामुळे शेतकरी बांधवांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे बहरलेली पिके ही उध्वस्त झाल्याने शेतकरी हा हाताश झाला असून हवालदिल झाला आहे. अक्कलकोट तालुक्यातील अतिवृष्टी बाधित शेतींची पाहणी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे , अक्कलकोट विधानसभेचे आमदार सचिन कल्याणशेट्टी व प्रशासनातील अधिकारी यांच्याकडून करण्यात आली. अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या बळीराजाला धीर देण्याचे काम पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले .तसेच अतिवृष्टीमुळे बाधित शेतींची पाहणे सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी करून शासनाकडे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावात पावसाच्या पाण्यामुळे आणि नदीकाठच्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने नागरिका हातबल झाला आहे. सध्या ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांचे पंचनामे सुरू झाले असून प्रशासकीय यंत्रणा कामाला लागले आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे ,आमदार सचिन कल्याणशेट्टी तसेच खासदार प्रणिती शिंदे यांनी शासन दरबारी शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. शेतीसाठी प्रती हेक्टरी मशागतीपासून ते  पेरणीसाठी येणारा खर्च तसेच उत्पादन याचा आधार घेऊन शेतकरी बांधवांना शासनाने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचें आता  शासनाच्या नुकसान भरपाई कडे लक्ष लागले आहे.
चौकट -अक्कलकोट तालुक्यात गेल्या महिनाभरापासून मुसळधार पाऊस सुरू असून अतिवृष्टी झालेली आहे. या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात तर नुकसान झालेच आहे पण शेतीचें देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे तसेच  पुराच्या पाण्यामुळे शेतातील माती वाहून जाणे , शेतातील बंधारे हे फुटलेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे पिकां सोबतच शेतींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.
Previous Post

महामानव कर्मवीर भाऊराव पाटील

Next Post

आरोग्य उपसंचालक, पुणे  व जिल्हा शल्य चिकित्सक यांचा रासकम. संघटनेच्या वतीने सत्कार

Admin

Admin

Next Post
आरोग्य उपसंचालक, पुणे  व जिल्हा शल्य चिकित्सक यांचा रासकम. संघटनेच्या वतीने सत्कार

आरोग्य उपसंचालक, पुणे  व जिल्हा शल्य चिकित्सक यांचा रासकम. संघटनेच्या वतीने सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157236
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697