Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपकडून राजेंद्र राऊत यांना उमेदवारी

Admin by Admin
May 31, 2026
in राजकीय
0
सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपकडून राजेंद्र राऊत यांना उमेदवारी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रविवारी रात्री उशिरा भाजपच्या केंद्रीय समितीने विधान परिषदेच्या विविध जागांसाठी उमेदवारांची अधिकृत यादी प्रसिद्ध केली.
सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील संख्याबळ लक्षात घेता भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने पक्षाचा उमेदवार कोण असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
या उमेदवारीसाठी माजी आमदार राजेंद्र राऊत आणि प्रशांत परिचारक यांच्यात चुरशीची स्पर्धा असल्याची चर्चा होती. मात्र अखेर पक्षश्रेष्ठींनी राजेंद्र राऊत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
राजेंद्र राऊत यांनी बार्शी नगरपालिका तसेच बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केलेल्या कामगिरीमुळे त्यांची पक्षातील पकड मजबूत झाली होती. स्थानिक पातळीवरील संघटनात्मक काम, जनसंपर्क आणि नेतृत्व क्षमता यांचा विचार करून भाजपने त्यांना ही संधी दिल्याचे मानले जात आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील संख्याबळाच्या आधारावर राऊत यांच्या विजयाची शक्यता बळावली आहे.

Previous Post

राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि पुण्याच्या विषारी दारूकांडावरून विरोधक आक्रमक

Next Post

दुधनी मार्केट कमिटीत पुतळा-मंदिर बांधकामावरुन तक्रार

Admin

Admin

Next Post
दुधनी मार्केट कमिटीत पुतळा-मंदिर बांधकामावरुन तक्रार

दुधनी मार्केट कमिटीत पुतळा-मंदिर बांधकामावरुन तक्रार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157097
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697