Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

चर्मकार आरक्षणाचे उपवर्गीकरण समाज हाणून पाडणार; आळंदी येथील राज्यव्यापी महाबैठक

Admin by Admin
May 29, 2026
in महाराष्ट्र
0
चर्मकार आरक्षणाचे उपवर्गीकरण समाज हाणून पाडणार; आळंदी येथील राज्यव्यापी महाबैठक
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 बबनराव घोलप, बाबुराव माने, संजय खामकर आणि डॉ.बाबा कांबळे यांची आरपारच्या लढ्याची हाक

आळंदी: -अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे ‘अ-ब-क-ड’ उपवर्गीकरण करण्याचा डाव चर्मकार समाज एकजुटीने पूर्णपणे हाणून पाडणार, असा एकमुखी निर्धार श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथे व्यक्त करण्यात आला. ‘समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा’ संस्थान येथे संस्थेच्या वतीने व कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांच्या पुढाकाराने चर्मकार समाजाची राज्यव्यापी ऐतिहासिक महाबैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्ष व समाजाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बबनराव घोलप यांची यांनी भूषवले, त्यांच्या अध्यक्षतेखाली ही ऐतिहासिक बैठक पार पडली,

लवकरच मुंबई येथे राज्यवापी आंदोलन उभारले जाईल, असे घोषणा, यावेळी बबनराव घोलप यांनी केले,

माजी आमदार बाबुराव माने यांनी चर्मकार समाजाने आंबेडकरी समाजासमवेत या लढ्यात पुढाकार घेण्याची महत्त्वाची भूमिका मांडली.
माजी आमदार बाबुराव माने म्हणाले.

संविधानाने दिलेले हक्क आणि आरक्षण वाचवण्यासाठी चर्मकार समाजाने आंबेडकरी समाजाच्या खांद्याला खांदा लावून या लढ्यात पुढाकार घेतला पाहिजे.असे संजय खामकर यांनी सांगितले

” महाराष्ट्रमध्ये चर्मकार समाजाची मोठी संख्या आहे. चर्मकार समाजावर अन्याय होऊ देणार नाही. चर्मकार समाजाची लोकसंख्या कमी दाखवून आरक्षण हिसकावण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, असे ठाम मत धन्य मांडले.डॉ. बाबा कांबळे यांनी व्यक्त केले.

उपवर्गीकरण विरोधातील या भूमिकेमुळे शासनाला हा निर्णय मागे घ्यायला भाग पाडावे लागेल, असे मत मुख्य वक्ता राहुल डंबाळे यांनी व्यक्त केले.

बैठकीत मंजूर करण्यात आलेले महत्त्वपूर्ण ठराव:

१.आरक्षण उपवर्गीकरणास तीव्र विरोध :
अनुसूचित जातीच्या आरक्षणात अंतर्गत विभागणी करून समाजाची ताकद कमकुवत करण्याचा कोणताही प्रयत्न चर्मकार समाज सहन करणार नाही. हा डाव रस्त्यावर उतरून हाणून पाडण्याचा संकल्प समाज बांधवांनी केला आहे.

२. जनगणनेतील त्रुटींवर कारवाईची मागणी:
शासकीय जनगणनेमध्ये चर्मकार समाजाची लोकसंख्या तब्बल ६० टक्क्यांनी कमी दाखवून अन्याय केला गेला आहे. हे गंभीर षडयंत्र रचणाऱ्या आणि चुकीची आकडेवारी नोंदवणाऱ्या दोषी यंत्रणेवर व अधिकाऱ्यांवर तत्काळ कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.

३. आंबेडकरी आंदोलनांना पाठिंबा:
संविधानाने दिलेले हक्क आणि आरक्षण वाचवण्यासाठी महाराष्ट्रात सुरू असलेल्या सर्व आंबेडकरी चळवळी व आंदोलनांना चर्मकार समाजाने आपला अधिकृत व जाहीर पाठिंबा दिला आहे.

४. मुंबईत धडकणार विराट आंदोलन:
आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आणि शासनाला जागे करण्यासाठी लवकरच संपूर्ण महाराष्ट्रातील चर्मकार समाज मुंबईत एकत्र येऊन भव्य ऐतिहासिक आंदोलन छेडणार आहे.

या बैठकीला ज्येष्ठ नेते बबनराव घोलप, माजी आमदार बाबुराव माने, भाऊसाहेब कांबळे, भारतीय धर्मसंघटन राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेवजी वाघमारे, कष्टकऱ्यांचे नेते,डॉ. बाबा कांबळे, आंबेडकरी चळवळीतील नेते राहुल डंबाळे, चर्मकार विकास संघाचे अध्यक्ष संजय खामकर, चर्मकार विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, ग्राहक कल्याण समिती महामंडळाचे माजी अध्यक्ष सूर्यकांत गवळे, राष्ट्रीय चर्मकार संघ प्रदेश अध्यक्ष शांताराम कारंडे, महिला आघाडीच्या नेत्या उर्मिला ठाकरे, स्वाभिमानी चर्मकार संघाचे अध्यक्ष सुरेश पोटे, राजू बनसोडे, अरुण माने, आनंद गवळी, एडवोकेट नारायण गायकवाड, विजय घासे, अंकुश आंबेकर, दिनेश जाधव, रवींद्र खैरे, संतोष टोनपे, जयदेव इसवे, सुदामा लोखंडे, दत्तात्रेय गोतीचे, अनिल कानडे, गजानन निंबोरे, सुभाष सोनवणे, राम कदम, रुक्मणी ननवरे यांच्यासह महाराष्ट्रातून आलेले अनेक दिग्गज पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत डॉ. बाबा कांबळे यांनी केले, तर विषयाची प्रस्तावना संजय खामकर यांनी मांडली.

कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा संस्थान चे कार्याध्यक्ष अनिल सातपुते, सचिव बाळासाहेब चव्हाण, उपाध्यक्ष सुखदेव सूर्यवंशी, विश्वस्त,श्रीभाऊ काळे, तुषार नेटके, दत्तात्रय शिंदे, मधुराताई डांगे, सुरेखा सुर्वे, व्यवस्थापक व पुजारी,नारायण गाडेकर, संदिपान महाराज घायाळ, सुदाम कांबळे, संतोष वाघमारे, सागर भोसले आणि सुनील कदम,यांनी केले. आभार तुषार(बाळु) नेटके यांनी मानले,अमोल वाघमारे यांनी प्रस्ताव, मांडला प्रस्तावाला अनुमोदन, अनिल सातपुते यांनी दिले,.

Previous Post

रुपया घसरतो तेव्हा सामान्य माणूस महागाईत भरडला जातो; पण स्विस बँकांमधील भारतीय श्रीमंतांचा पैसा आणि काळा पैसा मात्र वाढत जातो — ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

नगरसेवक महेश इंगळे यांच्या वतीने वटवृक्ष टर्फ क्रिकेट लीगचे आयोजन

Admin

Admin

Next Post
नगरसेवक महेश इंगळे यांच्या वतीने वटवृक्ष टर्फ क्रिकेट लीगचे आयोजन

नगरसेवक महेश इंगळे यांच्या वतीने वटवृक्ष टर्फ क्रिकेट लीगचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157101
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697