Thursday, September 3, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

आरोग्य उपसंचालक, पुणे  व जिल्हा शल्य चिकित्सक यांचा रासकम. संघटनेच्या वतीने सत्कार

Admin by Admin
September 22, 2025
in सोलापूर
0
आरोग्य उपसंचालक, पुणे  व जिल्हा शल्य चिकित्सक यांचा रासकम. संघटनेच्या वतीने सत्कार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

.सोलापूर ( रमेश सुरवसे ) महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्याचे डॉ.भगवान पवार उपसंचालक, पुणे मंडळ पुणे तसेच श्रीमती डॉ.वर्षा डोईफोडे, जिल्हा शल्य चिकित्सक, रुग्णालय , गुरुनानक चौक, सोलापूर यांचा  ” राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा शाखा सोलापूर यांच्यावतीने  नेते बाळकृष्ण पुतळे यांच्या संघटीत नेतृत्वाखाली तसेच सार्वजनिक आरोग्य कर्मचारी संघटनेचे नेते समीरभाई हुडेवाले आणि कोषाध्यक्ष हुसेनबाशा मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा शाखेचे युवा अध्यक्ष विजयकुमार भांगे आणि जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ सोनकांबळे यांच्या हस्ते डॉ.भगवान पवार यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर जिल्हा शल्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक श्रीमती डॉ.वर्षा डोईफोडे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक या पदाचा नुकताच पदभार स्विकारून रुजू झाल्याबद्दल जिल्हा शाखेचे  ज्येष्ठ नेते बाळकृष्ण पुतळे, जिल्हा कोषाध्यक्ष हुसेनबाशा मुजावर, जिल्हा उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते सटवाजी होटकर, आणि समीरभाई हुडेवाले यांच्या हस्ते त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेऊन श्रीमती डॉ.वर्षा डोईफोडे यांनाही शॉल श्रीफळ व पुष्पगुछ देऊन यतोचित भव्य सत्कार करण्यात आला. डॉ.भगवान पवार हे शासकीय कामाकरिता एक दिवसासाठी पुण्याहून सोलापूर दौऱ्यावर आले होते.यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी डॉ.भगवान पवार यांची जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.यावेळी रुग्णालयात आणि प्रशासनामध्ये विविध पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अडी अडचणी आणि प्रश्नांवर चर्चा केली.यावेळी डॉ.पवार यांनी जिल्हा पदाधिकाऱ्यांना त्यांच्या अधीपत्त्याखाली असलेल्या शहरी तसेच ग्रामीण रुग्णालयामध्ये व प्रशासनातील कर्मचाऱ्यावर कसलाही अन्याय न करता त्यांना प्रशासनाच्या माध्यमातून योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यानंतर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या सोलापूर,” जिल्हा शाखेचे प्रमुख पदाधिकारी तसेच राज्य सरकारी ( चतुर्थश्रेणी ) कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या आरोग्य खात्याचे युवा अध्यक्ष प्रभाकर होनकळस यांच्यासह सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व खातेनिहाय संघटनांचे प्रमुख पदाधिकारी व सभासद यांच्यावतीने सत्कार केला.यावेळी जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ सोनकांबळे यांनी डॉ.भगवान पवार यांचे सोलापूर शहरात प्रथमताच आगमन झाल्याप्रित्यर्थ संघटनेच्या वतीने त्यांचे विशेष स्वागत केले.व पुढील प्रशासकीय वाटचालीस आणि कारकिर्दीस रासकम.संघटनेच्या वतीने भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी सोलापूर आयटीआय.निदेशक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष  नेते बाळकृष्ण पुतळे, (आयटीआय, गट निदेशक) विभागीय सहसंचालक (उच्च शिक्षण) सोलापूर विभागाचे विभागीय अध्यक्ष नेते राजाभाऊ सोनकांबळे , सोलापूर जिल्हा मलेरिया विभागाचे माजी अध्यक्ष डॅशिंग ज्येष्ठ नेते, सी.एस.स्वामी व समीरभाई हुडेवाले, सोलापूर जिल्हा वाहन चालक कर्मचारी संघटनेचे, तसेच लिपिक संघटनेचे अध्यक्ष व जिल्हा कोषाध्यक्ष हुसेनबाशा मुजावर, जिल्हा कृषि अधिकारी/कर्मचारी संघटनेचे  नेते आर.जे.शिंदे,आयटीआय. कर्मचारी संघटनेचे संतोष गडगडे, जिल्हा भुजल व सर्व्हेक्षण कर्मचारी संघटनेचे  युवा अध्यक्ष व सहसचिव शशिकांत भालेराव, जिल्हा कोषागार कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष भिमराव लोखंडे, आयटीआय ( चतुर्थश्रेणी ) कर्मचारी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस ज्येष्ठ नेते जिल्हा उपाध्यक्ष सटवाजी होटकर, जिल्हा मलेरिया विभाग संघटनेचे सरचिटणीस व युवा नेते प्रविण वाघमारे व त्यांचे सहकारी पदाधिकारी गणेश कांबळे, दयानंद पवार , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर माने, तसेच युवा नेते सुनिल बोलबत्तीन, सार्वजनिक पाटबंधारे विभाग ( चतुर्थश्रेणी ) कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व जिल्हा संघटन प्रमुख अशुतोष नाटकर, सार्वजनिक आरोग्य विभाग कर्मचारी संघटनेचे अन्य पदाधिकारी व सभासद ,सिंचन भवन ( चतुर्थश्रेणी ) कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष व  ज्येष्ठ नेते चंद्रकांत चलवादी, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय ( चतुर्थश्रेणी ) कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नेते रघुनाथ बनसोडे, यांच्यासह राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना शहर, जिल्हा शाखेचे पदाधिकारी, सदस्य तसेच सर्व खातेनिहाय संघटनांचे प्रमुख पदाधिकारी व सभासद आदी सदरच्या सत्कार समारंभ कार्यक्रमांस मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous Post

अतिवृष्टीमुळे अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी उध्वस्त

Next Post

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई जमा करा – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

Admin

Admin

Next Post
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई जमा करा – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई जमा करा - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157511
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697