Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

संगठन सृजन अभियान’ यातील अनागोंदीबाबत तक्रार; महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी आ.रमेश चेन्निथला यांच्याकडून गंभीर दखल

Admin by Admin
May 30, 2026
in राजकीय
0
संगठन सृजन अभियान’ यातील अनागोंदीबाबत तक्रार; महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी आ.रमेश चेन्निथला यांच्याकडून गंभीर दखल
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

तिरुअनंतपुरम (केरळ) -महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी तसेच, केरळ राज्याचे विद्यमान गृहमंत्री मा.रमेश चेन्निथला यांची तिरुअनंतपुरम येथील केरळ विधीमंडळाच्या कार्यालयात सोलापूर जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा, माजी मनपा परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी जिल्ह्यात ‘संगठन सृजन अभियान’ राबविताना झालेली अनागोंदी, नियोजनातील त्रुटी व, कार्यकर्त्यांना आलेल्या अडचणी तसेच; पदाधिकाऱ्यांवर झालेल्या अन्यायाबाबतचे सविस्तर विश्लेषण करून त्यांनी निवेदन सादर केले.

*त्यांच्या सदर भेटीदरम्यान खालीलप्रमाणे काही महत्त्वपूर्ण अशा मागण्या मांडण्यात आल्या:*
१). आंदोलनात सहभागी झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते व, प्रतिनिधी मंडळाच्या भावना तसेच; सादर करण्यात आलेल्या निवेदनातील विषयांचा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (AICC) काँग्रेस कार्य समिती (CWC) यांच्या आगामी बैठकीमध्ये विचार करण्यात यावा.

२). भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या संविधानानुसार आणि, सध्याच्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील संघटनात्मक प्रश्नांबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, महासचिव तथा खासदार प्रियांका गांधी-वाड्रा आणि, पक्षातील इतर अनुभवी तथा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष चर्चा करून भेटण्यासाठी वेळ उपलब्ध करून द्यावा.

३). सध्याच्या निवड प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या नैतिक, संघटनात्मक आणि, लोकशाही व्यवस्थेच्या संदर्भातील प्रश्नांचा विचार करून सदर प्रक्रिया स्थगित अथवा; बरखास्त करण्यात यावी. तसेच, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमार्फत स्वतंत्र व, निष्पक्ष निरीक्षकांची नियुक्ती करण्यात यावी. काँग्रेस पक्षाच्या संविधानातील अनुच्छेद २२, २३ व, २४ अनुसार – पारदर्शक, लोकशाही व्यवस्थेवर आणि, नैतिक अधिष्ठानावर आधारित सर्वच जिल्हाध्यक्षांची निवड प्रक्रिया नव्याने राबविण्यात यावी.

तसेच, संगठन सृजन अभियानासाठी सोलापूर जिल्ह्याला नेमलेले ओडिशा प्रदेश काँग्रेसचे विद्यमान उपाध्यक्ष तथा माजी आमदार देबाशिष पटनायक ह्या निरीक्षकांनी सादर केलेल्या गोपनीय अहवालाची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशीही मागणी इथे करण्यात आली.

मा.रमेश चेन्निथला यांनी निवेदनाची गांभीर्याने दखल घेत योग्य स्तरावर याबाबत विचार करण्यात येईल असे त्यांना आश्वासन दिले आहे. तसेच, यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून स्पष्टीकरणही मागविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

लोकहित आणि, काँग्रेस पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने मांडण्यात आलेले हे विविध प्रश्न सकारात्मक पद्धतीने सोडविले जातील असा विश्वास मा.रमेश चेन्निथला यांनी व्यक्त केला आहे.

Previous Post

तुकाराम मुंढेंचा मोठा धडाका , अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई 

Next Post

सोलापुरात ३१ मे रोजी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने “दे धक्का “आंदोलन

Admin

Admin

Next Post
सोलापुरात ३१ मे रोजी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने “दे धक्का “आंदोलन

सोलापुरात ३१ मे रोजी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने "दे धक्का "आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157097
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697