Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट शहरातील अतिक्रमणे ही  टप्प्याटप्प्याने काढणार – मुख्याधिकारी रमाकांत डाके 

Admin by Admin
August 5, 2025
in सामाजिक
0
अक्कलकोट शहरातील अतिक्रमणे ही  टप्प्याटप्प्याने काढणार – मुख्याधिकारी रमाकांत डाके 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट शहरातील अतिक्रमणे ही टप्प्याटप्प्याने काढण्यात येणार असून विनापरवाना बांधकाम केलेल्या तसेच नियमबाह्य बांधकाम केलेल्या सर्वच बांधकामांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अक्कलकोट नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिले.
अक्कलकोट शहरात मोठ्या प्रमाणामध्ये विनापरवाना इमारती व दुकानांचें बांधकाम करण्यात आलेले असून याचाच भाग म्हणून अक्कलकोट नगर परिषदेकडून दिनांक २ ऑगस्ट रोजी बस स्थानका मागील ४९ गाळे विना परवाना बांधकाम म्हणून अतिक्रमण  काढण्यात आले. तसेच शहरातील इतर ठिकाणची जवळपास  ४१ अतिक्रमण केलेल्या दुकानांवर  कारवाई करण्यात आली. जवळपास ९० अतिक्रमण केलेल्या दुकानांवर व इमारतींवर कारवाई करण्यात आली. आतापर्यंत अक्कलकोट शहरातील अतिक्रमण विरोधात  सर्वात मोठी कारवाई म्हणून याकडे पाहण्यात येते. याबाबतची माहिती देताना अक्कलकोट नगर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी यापुढील काळामध्ये अक्कलकोट शहरातील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या अनधिकृत , विनापरवाना बांधकामांवर अक्कलकोट नगरपालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे.अक्कलकोट शहरात परगावच्या भाविकांसाठी राहण्यासाठी भक्तनिवास तसेच लॉज ची मोठ्या प्रमाणात उभे करण्यात आले आहेत. अनेक लॉज आणि भक्तनिवास इमारतीच्या पार्किंग मधील गाळे काढण्यात आले आहेत. या ठिकाणी वाहनतळ निर्माण करण्यात आले नाहीत. अशा नियमबाह्य भक्तनिवासांवर लवकरच कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे मुख्याधिकारी डाके यांनी सांगितले .तसेच अक्कलकोट शहरातील अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समिती मधील ६० गाळे हे विनापरवाना बांधकाम करण्यात आले असून त्या गाळ्याच्यां कागदपत्रांची तपासणी प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये जर दोषी आढळल्यास ६०  गाळ्यावर कारवाई करण्यात येणार आहे. हत्ती तलाव परिसरातील रस्ते रुंदीकरणामधील ५५ घरांना नोटीस देण्यात आली आहे. तसेच अक्कलकोट शहरातील घाण टाकी परिसरातील ४५ विनापरवाना बांधकाम केलेल्या घरांना नोटीस देण्यात आली आहे. नगरपालिकेच्या हद्दीतील जागांवर विनापरवाना बांधकाम करण्यात आलेल्या सर्वच घरांना नगरपालिकेमार्फत नोटीस देण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली .अक्कलकोट शहरातील अतिक्रमण हे टप्प्याटप्प्याने काढण्यात येणार आहे. नागरिकांच्या जशा तक्रारी प्राप्त होतील त्याप्रमाणे अतिक्रमणावर नगरपालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे. आतापर्यंत अतिक्रमण मोहिमेवर १५ लाख रुपये खर्च झाला आहे हा खर्च हा खर्च पाडकाम खर्च वकिलांचा खर्च पोलीस बंदोबस्त खर्च जेसीबी खर्च कोर्टात येण्या जाण्याचा भत्ता इत्यादी सर्व खर्च अतिक्रमण धारकांकडून वसूल करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली. तसेच भूसंपादनासाठी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीकडे निधी उपलब्ध करून देणार का याची विचारणा करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली.  अक्कलकोट शहरात आतापर्यंत अतिक्रमण विरोधात मोठी मोहीम नगरपालिकेकडून सुरू करण्यात आली असून आगामी काळात अक्कलकोट शहरातील अवैधरित्या तसेच विनापरवाना बांधकाम केलेल्या सर्वच दुकानांवर तसेच इमारतींवर कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे विनापरवाना बांधकाम केलेल्या नागरिकांचे धाबे दणाणले आहेत.

Previous Post

महात्मा गांधी विद्यालय परंडा येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची  जयंती उत्साहात साजरी 

Next Post

यशकल्याणी तर्फे जीवनगौरव पुरस्कार व इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा विजेत्यांना पारितोषिक वितरण समारंभ संपन्न 

Admin

Admin

Next Post
यशकल्याणी तर्फे जीवनगौरव पुरस्कार व इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा विजेत्यांना पारितोषिक वितरण समारंभ संपन्न 

यशकल्याणी तर्फे जीवनगौरव पुरस्कार व इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा विजेत्यांना पारितोषिक वितरण समारंभ संपन्न 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157241
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697