Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

यशकल्याणी तर्फे जीवनगौरव पुरस्कार व इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा विजेत्यांना पारितोषिक वितरण समारंभ संपन्न 

Admin by Admin
August 6, 2025
in सामाजिक
0
यशकल्याणी तर्फे जीवनगौरव पुरस्कार व इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा विजेत्यांना पारितोषिक वितरण समारंभ संपन्न 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रभावी वक्तृत्वासाठी संवाद, आत्मविश्वास आणि चौफेर वाचन ही त्रिसूत्री महत्त्वाची – डॉ.प्रचिती पुंडे( सुप्रसिद्ध व्याख्यात्या व प्रोलक्स ग्लॅमोवेल पुणे च्या संचालिका)

करमाळा ( आयुब शेख )यश कल्याणी सेवाभावी संस्था करमाळा, शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर व सोलापूर जिल्हा इंग्रजी शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण व जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना डॉ पुंडे म्हणाल्या की वक्तृत्व कला ही विद्यार्थ्याना आधुनिक काळात व्यक्तिमत्त्व विकसनासाठी महत्त्वाची असून इंग्रजी भाषा वक्तृत्वाने विद्यार्थ्याना जगाशी जोडले जाण्यासाठी यामुळे निशित फायदा होईल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यशकल्याणी सेवाभावी संस्थेतर्फे करमाळा येथील ख्यातनाम स्त्री रोगतज्ञ‌ डॉ. वसंतराव पुंडे, कर्नाटकातील पक्षी व पर्यावरण अभ्यासक प्राचार्य डॉ. अरविंद कुंभार, पिंपरी चिंचवड (पुणे) नगरपरिषद येथील निवृत्त प्रशासकीय अधिकारी श्रीमती शारदाताई लोंढे व मोहोळ येथील निवृत्त प्रा. व शिक्षण तज्ज्ञ गुरुनाथ मुचंडे यांना त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विशेष स्मृतीचिन्ह,मानपत्र व शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते. हा समारंभ करमाळा येथील यशकल्याणी सेवाभवन येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक पुण्यातील ख्यातनाम भूलतज्ज्ञ व मिसेस युनिव्हर्स प्रचिती पुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष गणेशभाऊ करे- पाटील, मातोश्री श्रीमती मालतीताई करे -पाटील , स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.अक्षय पुंडे, डॉ. कविता कांबळे , करमाळा गटशिक्षण अधिकारी जयवंत नलवडे, जिल्हाध्यक्ष प्रा. बाळकृष्ण लावंड, जिल्हा सचिव प्रा . धनाजी राऊत, जीवन शिक्षण फाऊंडेशनचे प्रा. जयेश पवार , अतुल दाभाडे, जिल्हा उपाध्यक्ष अगतराव भोसले, उपाध्यक्ष आबासाहेब दाढे, उपाध्यक्ष शशिकांत चंदनशिवे , सुखदेव गिलबिले,किशोर शिंदे, श्रीकांत सावंत, श्रीमंतराजे भोसले, आसिफ तांबोळी संजय कुचेकर , या समारंभास शरद शिंदे, गोपाळ पाटील, सुहास गलांडे ,शंकर दिरगुळे , आबा कारंडे, विजय राठोड, मोहोळकर , जाधव आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. या वेळी सोलापूर डिस्ट्रिक्ट इंग्लिश टीचर्स असोसिएशन व मार्फत घेण्यात आलेल्या इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत विजेतेपद मिळालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरण करण्यात आली. सदर समारंभाला जिल्ह्यातील इंग्रजी शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वक्तृत्व स्पर्धेच्या परीक्षणाचे काम प्रा. चंद्रकांत साळुंके, प्रा. संजय पवार, प्रा.तुषार सूत्रावे, दिपक सोनवणे या लातूर व धाराशिव जिल्ह्यातील परीक्षकांनी पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विष्णू शिंदे यानी केले. आभार तालुका अध्यक्ष कल्याणराव साळुंके यांनी मानले ,

जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी –

डॉ. वसंतराव पुंडे, डॉ. अरविंद कुंभार, श्रीमती. शारदाताई ताई लोंढे प्रा .गुरूनाथ मुचंडे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Previous Post

अक्कलकोट शहरातील अतिक्रमणे ही  टप्प्याटप्प्याने काढणार – मुख्याधिकारी रमाकांत डाके 

Next Post

मुख्यमंत्री तुम्ही निर्णय घ्या नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू– व्हॉईस ऑफ मीडिया चे संस्थापक  अध्यक्ष संदीप काळे

Admin

Admin

Next Post
मुख्यमंत्री तुम्ही निर्णय घ्या नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू– व्हॉईस ऑफ मीडिया चे संस्थापक  अध्यक्ष संदीप काळे

मुख्यमंत्री तुम्ही निर्णय घ्या नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू-- व्हॉईस ऑफ मीडिया चे संस्थापक  अध्यक्ष संदीप काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157243
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697