Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवाचा शानदार शुभारंभ

Admin by Admin
June 30, 2025
in टॉप न्यूज
0
श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवाचा शानदार शुभारंभ
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
गायिका राधा मंगेशकर यांच्या नक्षत्राचे देणे  कार्यक्रम संपन्न
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाच्या ३८ वा. वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवाचा शानदार शुभारंभ न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली दि. ३० जून रोजी सोमवार सायंकाळी ६.३० वा. विरक्त मठाचे श्री म.नि.प्र. पूज्य बसवलिंग महास्वामीजी, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे मुख्य पुजारी प.पू.श्री मोहन पुजारी,  श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे पुजारी वे.शा.सं.श्री अण्णू महाराज, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, कु. प्रथमेश इंगळे, श्री बसवराज शास्त्री तीर्थ, इंदोर (मध्यप्रदेश) चे नगरसेवक रमेश घाटे, तहसिलदार विनायक मगर, उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन पहिल्या पुष्पाचे उद्घाटन करण्यात आले.
दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज  व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर थोर संगित दिग्दर्शक व गायक पद्मश्री पंडीतजी ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली राधा मंगेशकर आणि सहकारी मुंबई यांचा ‘नक्षत्रांचे देणे, कार्यक्रम सादर करण्यात आला.  यांच्या समवेत केदार परांजपे, अमृता ठाकूर देसाई, ऋतुराज कोरे, विशाल गंडूतवार, अभिजित वाडेकर, सोनाली साठे यांनी साथ दिली. या सर्व कलाकारांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
चौकट :
श्रद्धांजली :-कार्यक्रमाच्या प्रारंभी पहलगाम हल्ल्यातील शहीद सैनिक व नागरिकांसह गुजरात विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 
उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचा सत्कार अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा कृपावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी व संजय कुलकर्णी यांच्या हस्ते यथासांग मंत्र पठणाने श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 
राधा मंगेशकर यांच्या नक्षत्राचे देणे या कार्यक्रमात हे हिंदुशक्ती शंभु तेजा हे प्रुभो शिवाजी राजा, जय जय स्वामी समर्थ..!, सुंदर ती…!, येणार साजन माझा…!, कोरा कागज..!, आदी मराठमोळ्या गाण्या बरोबरोच हिंदी सदाबहार गाण्यांनी उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली. मंडळाच्या ३८ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवाचा शानदार शुभारंभास श्रोतेगणांची प्रचंड गर्दी झाली होती.
यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई जनमेजयराजे भोसले, अर्पिताराजे अमोलराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, स्वाती निकम, रत्नमाला मचाले, कु. तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले, कु. स्वामिनीराजे अमोलराजे भोसले, स्मिता कदम, पल्लवी कदम, उज्वला भोसले, संगीता भोसले, रूपा पवार, स्वप्ना माने, कविता वाकडे, सुवर्णा घाडगे, राजश्री माने, क्रांती वाकडे, अनिता गडदे, धनश्री पाटील, सरोजनी मोरे, दिव्या मोरे, कल्पना मोरे, कोमल क्षीरसागर, शितल क्षीरसागर, अक्षता खोबरे, गौरी दातार, रुपाली भोसले, व न्यासाचे उपाध्यक्ष- अभय खोबरे, सचिव- शामराव मोरे, कु. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, विश्वस्त- भाऊ कापसे, संतोष भोसले, राजेंद्र लिंबीतोटे, प्रा. शरणप्पा आचलेर, मनोज निकम,  ओंकारेश्वर उटगे, बाळासाहेब मोरे, कैलास वाडकर, प्रभाकर मजगे, मल्लिनाथ स्वामी, अँड.संतोष खोबरे, रोहित खोबरे, अरविंद शिंदे, अप्पा हंचाटे, सौरभ मोरे, अॅड. प्रणीत जाधव सोलापूर, अॅड. परवेझ कुरनुरकर, राजु नवले, शितल जाधव, निखील पाटील, बाळासाहेब कुलकर्णी बबलादकर, मैनुद्दीन कोरबू, रोहन शिर्के, प्रा. सायबण्णा जाधव, अतिश पवार, प्रवीण घाडगे, गोटू माने, बाळासाहेब घाटगे, , प्रशांत साठे  यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले. तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी आभार मानले.  
गुणीजन गौरव  : फारूक महमदहनीफ शेख,( आश्रम शाळा,डीग्गेवाडी), प्रशांत श्रीपतराव माने,(प्राचार्य, खोपोली), सचिन देविदास सुरवसे,(वाहक,एस.टी.महामंडळ), यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थी गौरव : तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या ५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला.
चौकट :
अख्या मंत्री मंडळासह विधीमंडळातील पदाधिकाऱ्याकडून शुभ संदेश – श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाच्या ३८ वा. वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवाच्या कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष- अॅड.ना. राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष ना.अण्णा बनसोडे, विधानपरिषदेचे सभापती प्रा. ना.राम शिंदे, उपसभापती ना. नीलमताई गोऱ्हे, विरोधीपक्ष नेते ना.अंबादास दानवे, यांच्या सह राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, ना. अजित पवार यांच्या सह राज्याचे मंत्री, राज्यमंत्री यांनी शुभ संदेशाद्वारे शुभेच्छा दिले आहेत.
Previous Post

मुंबईत मराठा समाज आरक्षणासाठी  २९ ऑगस्टला मंत्रालयावर मोर्चा

Next Post

राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय येथे छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

Admin

Admin

Next Post
राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय येथे छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय येथे छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (789)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (225)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157236
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697