राजकीय
कृषिमंत्री कोकाटेच्या तोंडाला काळे फासण्याचा शिवसेना उबाठाचा इशारा

मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करण्यासाठी पार्क चौकात निदर्शने
सोलापूर ( प्रतिनिधी )
शेतकर्यांची कर्जमाफीच्या माध्यमातून क्रुर चेष्टा करणार्या कृषी राज्यमंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली रविवार दि.6 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये निदर्शने करण्यात आले
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकर्यांची क्रुुर चेष्टा केली आहे. कर्जमाफी तुम्हाला कशाला हवी आहे? तुम्ही मुला मुलींचे लग्न करता, विवाह करता, साखरपुडा देखील करता त्यासाठी पैसे लागत नाहीत का ? तेव्हा पैसे कुठून येतात. शेती करण्यासाठी तुमच्या काय योगदान आहे? शेतीमध्ये तुमचं भागभांडवल किती असतं सर्व राज्य शासनाने द्यायचं का? असा अशी बेताल वक्तव्य करून राज्यातील तमाम शेतकरी बांधवांची कृषिमंत्र्यांनी अवमान केला आहे. याच्या निषेधार्थ आंदोलन केले जात आहे. त्याचाच एक भाग मधून सोलापूर शहर शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा विजय असो, कृषिमंत्री माणिकराव यांचा जाहीर निषेध असो, मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री यांचा निषेध असो, मंडळातून हकलपट्टी झालीच पाहिजे.अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.
महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून यापूर्वी मोठ्या प्रमाणात शेतकर्यांना कर्जमाफी दिली होती.मात्र या सरकार सरकारला शेतकर्यांच कसलेच देणे घेणे नाही त्यामुळे कर्जमाफी पासून अनेक शेतकरी वंचित असल्यास असल्याची टीका यावेळी शिवसैनिकांनी केली.
या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष पाटील युवा सेना युवा अधिकारी बालाजी चौगुले, उपजिल्हाप्रमुख खंडू सलगरकर, संतोष घोडके उपशहर प्रमुख सचिन माने, रमेश चौगुले, संगप्पा कोरे, किरण येळवणे, रवी घंटे,विकास डोलारे, रवी डोके, विश्वजीत चौगुले, किरण मिश्रा, प्रशांत पाटील, विठ्ठल कदम अदि शिवसैनिक उपस्थित होते.
चौकट : –
कृषीमंत्री कोकाटे यांनी यापुर्वी शेतकर्यांचा अवमान केला आहे. त्यामुुळे त्यांची मंत्रीमंडाळातून तात्काळ हाकालपट्टी करावी अन्यथा कोकाटे यांच्या तोंडाला काळे फासू
संतोष पाटील : जिल्हाप्रमुख, उबाठा सेना