सोलापूर

श्री. सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीतील नवनिर्वाचित संचालक मंडळाचा भव्य नागरी सत्कार संपन्न 

 

 सोलापूर ( प्रतिनिधी ) सोलापूर जिल्ह्यातील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा तसेच सभापती व उपसभापती यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी सभापती . दिलीप माने, उपसभापती  सुनील शेळके यांच्यासह नव्याने निवड झालेल्या संचालक मंडळातील सदस्यांचे अभिनंदन व सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कृषी उत्पन्न बाजार समित्या या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, त्या शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील विश्वासाचं दुवा म्हणून काम करतात. ग्रामीण भागात आर्थिक घडामोडींना चालना देण्याचं काम बाजार समित्यांमधून होते. नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात आपल्या ग्रामीण शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळेल, असा विश्वास यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी श्री श्री श्री १००८ जगतगुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्या शिवाचार्य महास्वामीजी, श्री. ज्ञानपीठ काशी, संचालक . सुरेश हसापुरे, संचालक श्रीशैल नरोळे यांच्यासह संचालक मंडळातील इतर सदस्य, व्यापारी घटनेचे पदाधिकारी व हमाल, तोलार आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Oplus_16777216

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button