Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

छगन भुजबळांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ  

Admin by Admin
May 20, 2025
in महाराष्ट्र
0
छगन भुजबळांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ  

Oplus_16777216

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

  

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनात सकाळी छगन भुजबळ यांचा शपथविधीचा सोहळा पार पडला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असतानाही छगन भुजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. अखेर भुजबळांची मंत्रिपदी वर्णी लागली असून, त्यांनी आज सकाळी दहा वाजता राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली. भुजबळांची मंत्रिपदी वर्णी न लागल्याने ओबीसी समाज आणि समता परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज झाले होते. त्यामुळे भुजबळ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण तत्कालीन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात विविध आरोपांना सामोरे जावे लागल्यानंतर राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हाच भुजबळांना पुन्हा मंत्रिपद मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. अखेर आज ही चर्चा खरी ठरली असून, भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा खात्याचे जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. मागील सरकारमध्ये छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती. मात्र नंतर हे खाते धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आले. आता हेच खाते पुन्हा एकदा छगन भुजबळांकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. छगन भुजबळ यांनी आतापर्यंत नगरसेवक ते उपमुख्यमंत्री पदापर्यंत सरकारमध्ये यशस्वीपणे काम केलं आहे.

Previous Post

श्री. सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीतील नवनिर्वाचित संचालक मंडळाचा भव्य नागरी सत्कार संपन्न 

Next Post

लोकराजे छत्रपती शाहू महाराज

Admin

Admin

Next Post
लोकराजे छत्रपती शाहू महाराज

लोकराजे छत्रपती शाहू महाराज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157262
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697