राजकीय
गुरु – शिष्याच्या पॅनलच्या लढतीकडे लागले अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे लक्ष !

अक्कलकोट ( स्वामीराव गायकवाड ) सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची सर्वत्र चर्चा सुरू असून माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पॅनलमध्ये लढत होत आहे. गुरु आणि शिष्याच्या पॅनलमध्ये होणाऱ्या लढतीकडे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत गुरु शिष्याला की शिष्य गुरूला भारी ठरणार हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
राज्यात तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक उलाढाल असणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल आणि माजी मंत्री , आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखालील श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनल मध्ये लढत होत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण १८ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी दोन्ही पॅनलमध्ये मातब्बरांना संधी देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी राजकारणात आजवर एकमेकांचे कट्टर शत्रू राहिलेले आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख हे एकत्र आल्याने हा जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरला आहे. माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलला आमदार विजयकुमार देशमुख , काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी पाठिंबा दिला. तर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलला आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने , काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे आदींनी पाठिंबा देत काहीजण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पॅनलमध्ये लढत होत आहे .अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी हे माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कामात सुरुवात केल्याचे अनेक वेळा सांगितले आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी हे आमदार सुभाष देशमुख यांना गुरु म्हणून मानतात. तर आमदार सुभाष देशमुख हे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना आपला शिष्य मानतात. त्यामुळे या दोघा आमदारद्वयींचे नाते हे गुरु – शिष्य असेच राहिले आहे . सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मात्र गुरु आणि शिष्य एकमेकांच्या समोरासमोर आल्याने या लढतीकडे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. याची चर्चा ही अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानेच पॅनल बनविण्यात आल्याचे सांगितले तर आमदार सुभाष देशमुख यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांसाठी आम्ही एकत्र आल्याचे सांगितले आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे सर्वपक्षीय मंडळींचे तसेच नागरिकांचे लक्ष लागले आहे. राज्यात आर्थिक उलाढालीत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा तिसरा क्रमांक लागतो. अशा या सहकार क्षेत्रातील कोट्यावधीचीं उलाढाल असणाऱ्या बाजार समितीत वर्चस्व मिळविण्यासाठी गुरु आणि शिष्य कामाला लागले आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची चर्चा मात्र आता अक्कलकोट विधानसभा जिल्ह्यात सुरू आहे. सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत गुरु शिष्याला की शिष्य गुरूला आसमान दाखवणार हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार असून राजकीय क्षेत्रातील वर्चस्व राखण्यासाठी आमदार सुभाष देशमुख आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी हे सर्वस्व पणाला लावून कामाला लागल्याचे दिसत आहे.