देश - विदेश
भारताचे माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृती दिनी अभिवादन

नवी दिल्ली -काँग्रेस अध्यक्ष . मल्लिकार्जुन खरगे व लोकसभा विरोधी पक्षनेते . राहुल गांधी
यांनी वीरभूमी येथे भारतरत्न दिवंगत . राजीव गांधी यांना स्मृती दिनी विनम्र श्रद्धांजली अर्पण केली. स्व.राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीने भारतात आयटी क्रांतीचा पाया घातला, स्थानिक स्वराज्य संस्थांना बळ दिलं आणि आधुनिक भारताची पायाभरणी केली.तंत्रज्ञान, तरुणांचे सक्षमीकरण आणि लोकशाहीच्या मूल्यात विश्वास ठेवणाऱ्या या नेतृत्वाचा वारसा आजही प्रेरणा देतो.काँग्रेस अध्यक्ष . मल्लिकार्जुन खरगे व लोकसभा विरोधी पक्षनेते . राहुल गांधी
यांनी वीरभूमी येथे भारतरत्न दिवंगत . राजीव गांधी यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली. तसेच काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यानी वीरभूमी येथे स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनी अभिवादन केले.