सामाजिक
अक्कलकोट येथे श्रीराम जन्मोत्सव समितीमार्फत श्रीराम नवमीनिमित्त्त भव्य शोभायात्रा संपन्न

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) श्रीराम जन्मोत्सव समितीमार्फत श्रीराम नवमीनिमित्त्त आज ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते श्रीरामाची आरती झाल्यानंतर शोभायात्रेस प्रारंभ झाला. शोभायात्रा शांततेत पार पडली. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
मल्लिकार्जुन मंदिराजवळ व्यासपीठावर प्रभु श्रीरामाची मुर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली होती. प्रारंभी हिंदु धर्मातील सर्व ज्ञाती संस्थांचे प्रमुख व सर्व समाज बंधु भगिनी,राजकीय,सामाजिक क्षेत्रातील सर्व प्रतिष्ठीत नागरिक यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. आमदार सचिन कल्याणशेट्टी, अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले,वटवृक्ष देवस्थानचे प्रथमेश इंगळे,मिलन कल्याणशेट्टी,आनंद तानवडे,महेश हिंडोळे,आप्पासाहेब पाटील, मल्लिनाथ स्वामी आदींच्या हस्ते महारती करण्यात आली. महाआरतीनंतर शोभायात्रेला सुरुवात झाली. हलगी पथक, प्रत्येक समाजाचे दैवत,संत,महापुरुष यांचे प्रतिमा (फोटो) लावलेले रिक्षा पथक,लहान मुलांचे ध्वज पथक,महिला बंधु भगिनी,पुरुष भगवे टोप्या,शाली,फेटे बांधुन घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावर्षीच्या शोभायात्रेत हनुमान,शंकर-पार्वती,प्रभु श्रीराम, गोमाता यांची आकर्षक मुर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. जय श्रीराम, भारतमाता कि जय, वंदे मातरम्, हर हर महादेव या घोषणा देऊन सर्व तरुणांनी शहरातील वातावरण राममय करुन टाकले. शोभायात्रा मल्लिकार्जुन मंदिरापासून सुरुवात होऊन शहरातील मुख्य मार्गावरुन जाऊन स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथील आई तुळजाभवानी मंदिरात समारोप करण्यात आला. अन्नछत्र मंडळाकडून उपस्थित रामभक्तांना थंड मठ्ठाची व्यवस्था करण्यात आली होती. शोभायात्रेचे विविध चौकांमध्ये पुष्प वर्षाव करुन नागरिकांकडून स्वागत करण्यात आली.
शोभायात्रेत यशवंत धोंगडे,महेश हिंडोळे,समाजसेवक तम्मामामा शेळके,चेतन जाधव, संतोष वगाले,रामु समाणे,प्रदिप हिंडोळे,श्रीराम जन्मोत्सव समितीचे ऋषीकेश लोणारी,राहुल वाडे,प्रसन्न गवंडी,सौरभ हाळके,धनराज पाटील,प्रितीश किलजे,देवा गवंडी,प्रशांत शिंपी,अभिजीत लोके, दत्ता कटारे,चंद्रकांत दसले,दयानंद बिडवे,श्रीकांत झिपरे,चंद्रकांत जकापुरे,संदीप कटकधोंड,समर्थ आडवितोटे,शिवराज तडवळ, शरणय्या मसुती आदीसह विविध समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव,गोपनीय चे मारुती हनुरे,सचिन चव्हाण, राजकुमार कोळी आदीसह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.



