शैक्षणिक
दहावी बोर्डाचे गणित पेपर दुपारी संपला कस्टडीला रात्री उशीरा का पोहचला? – अविनाश मडिखांबे

अक्कलकोट(प्रतिनिधी)-सद्या अक्कलकोट तालुक्यातील दहावीचा पेपर चालू आहे.दि.सात शुक्रवार रोजी दहावीच्या गणित दोन पेपर दुपारी दिड वाजता संपला.तर पेपर संपल्यावर दोन तासाच्या आत सुरक्षित कस्टडीला पोहचला पाहिजे असतांना रात्री उशीरा का पोहचली? याचे सखोल चौकशी करण्याचे मागणी रिपाइं तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व मुख्यकार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पूर्वी दहावी व बारावीचे पेपर चे कस्टडी गेल्या अनेक वर्षापासून श्री शहाजी हायस्कूल अक्कलकोट या ठिकाणी होता.याच वर्षी त्या ठिकाण चे कस्टडी स्थळ बदल करून पंचायत समिती अक्कलकोट येथील सभापती कार्यालयात आणण्यात आले, अनेक वर्षापासून शहाजी प्रशालेत कार्यरत असलेले कस्टडी कार्यालय बदलण्याचे कारण काय?याचे उद्देश काय आहे? हे पण विचार संशयास्पद आहे.
शुक्रवारी सात मार्च २०२५ रोजीचा गणित पेपर नंबर २ या पेपर शुक्रवारी ११ ते दिड या वेळेत होता. पेपर संपल्यानंतर दोन ते अडीच या वेळेत सर्व पेपर एकूण गोळा करण्यासाठी कस्टडी ऑफिस पंचायत समिती अक्कलकोट येथे येण्याचे अत्यंत गरजे चे होता तसं न होता पेपर कुठे जमा केले काही कळाले नाही तब्बल रात्री पावणे नऊ वाजता एका रीक्षातून पेपर उतरवत होते. त्या ठिकाणी संबंधित अधिकारी सुद्धा उपस्थित नव्हते. बोर्डाचे पेपर एवढं दुर्लक्ष करणारे अधिकारी कोण आहे असे चौकशी केली असता हे काम अक्कलकोटचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी प्रशांत आरबाळे यांनी आहे असं कळाले. पेपर संपल्यानंतर रात्री पावणे नऊ पर्यंत पेपर कुठे होते कोणी सांगण्यास तयार नाही. पेपर कस्टडीत आल्यानंतर सील बंद करायचं असतो तसे न होता कुठेतरी बाहेर सील करून कस्टडीला रात्री पाहुणे नऊ वाजता खाजगी रिक्षातून पेपर आणले आणि रोजचा पेपर असाच होत आहे का ? हा पंचायत समितीतील सीसीटीव्ही फुटेज चेक करून बघणे अति आवश्यक आहे, याप्रकारे सरकारी कामात दुर्लक्ष करणारे विद्यार्थ्यांचे जीवाशी खेळणारे प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत
आरबाळे यांच्या सखोल चौकशी करुन बडतर्फ करावे.
प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे त्याने प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून पदभार घेतले पासून वादग्रस्त ठरले आहे. असे निष्क्रिय व दुर्लक्ष अधिकाऱ्याला घरचा रस्ता दाखवावे असे आरपीआय आठवले गट चे अक्कलकोट तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी संबंधित शिक्षण मंत्री , जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहेत.या प्रसंगी रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी,युवक ता उपाध्यक्ष कृष्णा धोडमनी,दुधनी शहर अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी,आंदेवाडी(ज)शाखाध्यक्ष रमेश धोडमनी सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
