शैक्षणिक
डॉ. धानय्या कौटगीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली २५ विद्यार्थी कर्नाटक टीईटी परीक्षेत यशस्वी

अक्कलकोट : ( प्रतिनिधी )
येथील के. एल. ई. मंगरूळे हायस्कूलचे शिक्षक डॉ. धानय्या कौटगीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटक शिक्षक पात्रता परीक्षा ( के टी इ टी)२०२५ मध्ये २५ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
कर्नाटक शासनाच्या शिक्षण विभाग, बेंगळुरू यांच्या वतीने ही परीक्षा ७ डिसेंबर २०२५ रोजी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल २३ डिसेंबर २०२५ रोजी अवघ्या १६ दिवसांत जाहीर करण्यात आला.
डॉ. धानय्या कौटगीमठ यांनी यूट्यूबच्या माध्यमातून शिक्षक पात्रता परीक्षेबाबत पूर्णतः मोफत व दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध करून दिले.
त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत २५ विद्यार्थ्यांनी टीईटी परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली.
विशेष बाब म्हणजे, डॉ. कौटगीमठ यांनी स्वतः देशातील विविध राज्यांमध्ये ७९ वेळा सेट,नेट आणि टी इ टी परीक्षा उत्तीर्ण होत जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. स्वतःचा अनुभव, ज्ञान, माहिती आणि कौशल्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे व तेही यशस्वी व्हावेत, या उद्देशाने ते यूट्यूबच्या माध्यमातून सातत्याने नि:स्वार्थपणे मार्गदर्शन करत आहेत.
अलीकडेच महाराष्ट्र सेट परीक्षा २०२५ मध्ये २९ विद्यार्थी तसेच कर्नाटक सेट परीक्षा २०२५ मध्ये ४०७ विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तीर्ण झाले आहेत. आतापर्यंत एकूण १४०५ विद्यार्थी सेट , नेट व टी इ टी परीक्षा उत्तीर्ण झाले असून ही बाब शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
कर्नाटक टीईटी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
१.संगमा (यादगिरी)२.ख्यामलिंग (कलबुर्गी)
३.सतिश बिरादार (बेळगाव)४ मेघा (धारवाड)
५.डॉ. प्रवीण गुरव (कन्नड विद्यापीठ, हंपी)
६..कलावती (तुमकूर)७.पृथ्वीराज सर (दावणगेरे)
८.मंजुश्री कित्तूर (बैलहोंगल)९..मणिकाम्म चीकमठ (विजयपूर)१०.सौरभ पाटील (कलबुर्गी)११.महादेव माने (बेळगाव)१२.अनिलकुमार शेट्टी (कमलापूर)
१३.सोमनाथ कोडते (इंडी)१४.सुनीलकुमार जी. एच. (चिकबळापूर)१५.चंद्रकला (बेंगळुरू) .१६..डॉ. द्यामावा हिरेमणी (बागलकोट)१७..वेंकटेश्वरी (यादगिरी)१८.ज्योती हेब्बाळकर (धारवाड)
१९..गद्दना उप्पार (तालीकोट)२०..केंचम्मा टी. (होसपेठ)२१..चंद्रप्पा के. सी. (बेल्लारी)२२…हनुमेश (रायचूर)२३..सुषमा गोलगेरीमठ (विजयापूर)
.२४..गणेश गौड (धारवाड)२५. मंजू कोळी ( बेळगांव )डॉ. धानय्या कौटगीमठ यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या मार्गदर्शनामुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना मोठा लाभ होत आहे.



