टॉप न्यूज
शिवपूरी येथे १२ मार्च रोजी अग्नी मंदिराचे भूमिपूजन

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
शिवपुरी(अक्कलकोट)ही वेदधर्माची मान्यताप्राप्त भूमी आहे याची आपल्या सर्वांना कल्पना आहे.
श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पीठावर १९३८ मध्ये परमसद्गुरू श्री गजानन महाराज विराजमान झाले.तेंव्हापासून अक्कलकोट चे नाव विश्वभर गेले याचीही पुष्कळांना जाणीव आहे. शिवपुरीमध्ये आता १२ मार्च या अतिपवित्र दिवशी विश्वाला ऊर्जा व दिशा देणारी जी वास्तू उभी राहणार आहे तिचे भूमिपूजन सकाळी ०९:३० च्या सुमारास होणार आहे. विविध क्षेत्रातील निमंत्रित तसेच परमसद्गुरू श्री गजानन महाराज प्रणित वेदोक्त पंचसाधन मार्गाचे ठिकठिकाणचे अनुयायीही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
शिवपुरी(अक्कलकोट) च काय किंवा सोलापूर जिल्हा ऐव्हढाच प्रदेश यामुळे आनंदनार नसून
महाराष्ट्र, कर्नाटक यासह साऱ्या विश्वाला एक दिशा प्राप्त होईल असा आनंद होईल.
आतापर्यंत ठिकठिकाणी युरोप-अमेरिका सह House of Fire, अग्निगृहे निर्माण झाली आहेत. परंतु शिवपुरीचे एक वैशिष्ट्य आहे. याठिकाणी १९६९ मध्ये अद्वितीय असा सोमयाग संपन्न झाला. तो विश्वशांती साठी होता व सर्व जगभरातून त्याला प्रतिसाद मिळाला होता अग्निमंदिर यांस मंदिर जरी म्हटले तरीही याठिकाणी कोणतीही मूर्ती वा फ़ोटो नसतो. शिवपुरीच्या सूर्योदय सूर्यास्त या वेळेनुसार या मंदिरात केवळ अग्निहोत्र केले जाईल जे मूलभूत आहे.
आज कमीतकमी ६० देशातील लोक अग्निहोत्राशी परिचित असून ते नित्य अग्निहोत्र करतात. या यज्ञाच्या
अनुकूल अनुभवाने ते इतर यज्ञ-हवनही करीत आहेत. या अग्निमांदिरात अग्निहोत्राशिवाय दुसरा कोणताही
विधी होत नसतो. परमसद्गुरू एकदा म्हणाले, येथील वातावरण केवळ अग्निहोत्र मंत्रांनी तयार व
पोषणयुक्त होते.या अग्निमांदिराचा परिसर शांततामय असतो. येथे दुसरा कोणताही शब्द उच्चारला जात
नाही. या वातावरणात भावातीत ध्यानाचा अनुभव येऊ शकतो तो त्या व्यक्तीच्या समरसतेवर अवलंबून
आहे.१२ मार्च हा दिवस निश्चित करण्याचे कारण म्हणजे त्याच दिवशी १९४२ मध्ये परमसद्गुरूंना त्यांच्या श्रेष्ठ सद्गुरु कडून पूर्णाभिषेक दीक्षा (त्रिपुरी विद्या) मिळाली. हा दिवस जगभरातील वेदमार्गाचे अनुयायी अत्यंत पवित्र मानतात.
परमसद्गुरू श्री गजानन महाराज यांचे नातू पूज्य श्री डॉ पुरुषोत्तम महाराज यांनी संबोधन केल्याप्रमाणे
ही वास्तू जेव्हा पूर्णत्वास जाईल त्यावेळी ती जगभरातील सर्वांचे प्रमुख आकर्षण केंद्र होईल.
