रा गे शिंदे महाविद्यालयात वार्षिक आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

तंबाखू मुक्तीची घेतली शपथ
परंडा / धाराशिव ( फारूक शेख ) श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परांडा आणि उपजिल्हा रुग्णालय परांडा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात वार्षिक आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालय परांडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ पी बी जाधव डॉ जे आर यादव व डॉ भुयार तसेच समन्वयक तानाजी गुंजाळ फार्मासिस्ट शिंदे टी एन आणि परिचारिका एस एम गायकवाड यावेळी आरोग्य तपासणीसाठी उपस्थित होते. व्यासपीठावर कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख व कनिष्ठ विभागातील सर्व सहशिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तानाजी गुंजाळ समन्वयक यांनी तंबाखू मुक्तीची शपथ दिली व सामूहिकरीत्या सर्वांनी घेतली. यावेळी कनिष्ठ भागातील सर्व विद्यार्थ्यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. याचवेळी वैद्यकीय अधिकारी डॉ जाधव डॉ यादव डॉ भुयार यांनी तंबाखू गुटखा अशा विविध व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर आपल्या आरोग्याची कशी हानी होते हे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विस्तृत स्वरूपामध्ये सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा संतोष भिसे यांनी केले तर प्रा अंकुश शंकर यांनी आभार मानले.


