सामाजिक
राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय येथे छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) बहुजन समाजाला
सोबत घेऊन जाणारे लोकराजे छत्रपती शाहू
महाराज यांची जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय येथे साजरी करण्यात आली. राजमाता जिजाऊ मंगल कार्य
लय व भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमात रिर्झव बँकेचे सेवानिवृत्त मॅनेजर दिलीप कदम (मंगल कार्यालयाचे मालक), माजी मुख्याध्यापक राजकुमार बंनसोडे, दिलीप शीवशरण, कमलाकर काबळे( सोलापूर जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा –
) यांनी शाहू महाराजांचे गौरवशाली विचारांवर मार्गदर्शन केले. यावेळी भिमाशंकर घटकांबळे, मेजर शंभूदेव सुरवसे व उपस्थितां कडुन मानवंदना देण्यात आली.



