सामाजिक

केशरी कार्डधारकाना धान्य मिळावे व  पिवळे कार्ड धारकाच्या धान्य वितरणातील त्रुटी दुर व्हावेत, शिवसेनेचे निवेदन

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
 दुष्काळ तीव्रता वाढल्याने सार्वजनिक वितरण व्यवस्था प्रणाली पुरवठा अधिकारी यांचे कडून वितरीत होणारे धान्य यासुन कोणीही वंचित राहु नये दक्षता घेणे त्रुटी दुर करणे केशरी कार्ड धारकाना धान्य वितरीत करावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने
करण्यात आली असुन या मागणी चे निवेदन
नायब तहसीलदार संजय भंडारी यांना देण्यात आले . याप्रसंगी
निवेदन देत असताना जिल्हा संघटक सोपान निकते जिल्हा समन्वयक आय्याज जमादार जिल्हा उपप्रमुख मनोज पवार तालुका संघटक वसंत  एन देडे, सुधाकर गायकवाड दीपक कदम संतोष माने आदी,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते
महाराष्ट्रात सर्वत्र भिषण दुष्काळ आहे ह्यातच सोलापुर जिल्हा अक्कलकोट तालुका अवर्षण प्रवण क्षेत्रात असलेला आहे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सार्व वितरण व्यवस्था पुरवठा विभाग मार्फत वितरीत होणारे धान्य सर्वाना मिळावे यातील त्रुटी दुर व्हावेत . दुष्काळ पडल्याने शेता मध्ये खरीप रब्बी पिके आली नाहीत पाणी टंचाई तीव्र आहे अशा कठीण प्रसंगी टंचाई काळ दुष्काळ असल्याने धान्य पिकलेच नसल्याने विशेष बाब म्हणून केशरी कार्डधारकाना धान्य मिळावे पिवळे कार्ड धारकाच्या धान्य वितरणातील त्रुटी दुर व्हावेत . पिवळे कार्ड धारकाना अविभक्त कार्ड धारक त्यांचे नातेवाईक यांचे आर्थिक स्थर उंचावले असले तरी त्यांचे नातेवाईक यांना पिवळे कार्डच्या सुविधा मध्ये खंड पडत असल्याचे तक्रार प्राप्त आहेत . यामुळे यातील त्रुटी दुर व्हावे असे निवेदनात नमुद केले आहे . निवेदनाची त्ववरी त दखल घ्या वी
  अन्यथा दुष्काळ स्थितीत धान्य मिळण्यासाठी लोकशाही मार्गान आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल असा इशारा वसंत देडे तालुका संघटक यांनी दिला आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button