सामाजिक

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानतर्फे दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना फराळ वाटप

फराळाच्या गोडव्यातून सामाजिक बांधिलकीचा दिवाळीचा आनंद
दुष्काळाचे भान ठेवून साधेपणाने दिवाळी साजरी करा : -प्रा. शरद डोके
सोलापूर : ( प्रतिनिधी ) दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवून विद्यार्थ्यांनी दिवाळी साधेपणाने साजरी करावी. फटाके घेण्यासाठी आई-वडिलांकडे हट्ट धरू नये, त्यांच्यावर आर्थिक दबाव टाकू नये. तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजचे माजी प्राचार्य प्रा. शरद डोके यांनी केले.
            श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने खेड येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना बेसन लाडू, रवा लाडू, करंजी, चकली, चुरमुरे, शंकरपाळी आदी फराळाचे साहित्य देण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांसोबत दिवाळीचा आनंद वाटून घेत प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमाला शरद कालाणी यांचे विशेष योगदान लाभले.
          यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक आप्पासाहेब पुजारी, छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजचे माजी प्राचार्य प्रा. शरद डोके, माजी उपसरपंच नागेश कोकरे, मदनलाल ब्रदर्सचे नितेश भंडारी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संतोष नुल्ला, अंगणवाडी सेविका प्रियंका नवगिरे आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कासट आदी उपस्थित होते.
          मनोगत व्यक्त करताना प्रा. डोके यांनी, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवावी. फटाक्यांसाठी हट्ट न करता उपलब्ध परिस्थितीत आनंदाने दिवाळी साजरी करावी. पाण्याचे महत्त्व ओळखून त्याच्या बचतीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षता कासट, शुभांगी लचके, श्रेया लचके, संतोष अलकुंटे, अभिजीत व्हानकळस, दीपक करकी, सुरेश लकडे, रंजना व्हानमाने, सोनाली वाघमारे, रेणुका कोकरे, महादेव सावंत, प्रकाश काळे, मच्छिंद्र देवकते आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन ज्योत्स्ना सिरसाट यांनी केले, तर गंगाबाई काळे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button