क्राईम

माजलगाव शहरात छुप्या पध्दतीने चालणा-या मटका बुक्की चालकांवर माजलगाव शहर पोलीसांचा छापा

 

माजलगांव / बीड ( नाजेर कुरेशी )
दिनांक २७ डिसेंबर रोजी माजलगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  राहुल सुर्यतळ यांना गोपनिय बातमीदाराने माहीती दिली की, चर्च चे बाजुला केसापुरी कॅम्प येथे रोडचे बाजूस इसम नामे बिलाल हुसेन सय्यद वय ४० वर्षे रा. केसापुरी कॅम्प, माजलगाव हा त्याचे मोटार सायकलवर बसुन लोकांकडून पैसे घेवुन कल्याण मटका जुगार आकड्यांवर पैसे लावून घेवुन मटका जुगार खेळत व खेळवित आहे अशा खात्रीशीर बातमी मिळाल्याचे आधारे माजलगाव शहर पोलीसांनी सदर ठिकाणी जावून चर्च चे बाजुस छापा मारला असता त्याठिकाणी मोटार सायकल क्रं. एम एच ४४ डब्लू ६६२५ हिरो कं ची हिचेवर बसुन मटका आकडे घेत असलेला इसम मिळून आलेने त्याचेकडे कल्याण मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम ५२१०/- रु दोन मोबाईल किमती २२०००/- रु चे, मोटार सायकल किमती ५००००/- रु. ची असे एकुण ७७२१०/- रु. चा मुद्देमाल मिळून आलेने त्याचे विरुध्द माजलगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करुन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

सदरची कारवाई नवनित कांवत, पोलीस अधिक्षक, बीड़, श्रीमती चेतना तिडके, अप्पर पोलीस अधिक्षक अंबाजोगाई, कमलेश मीना, सहा. पोलीस अधिक्षक उपविभाग केज, अति, पदभार उपविभाग, माजलगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ, पोलीस उपनिरीक्षक के. बी. माकणे, सफो/११६५ मुंढे, पोशि/२२९९ थापडे, पोह/१५३७ भंडाणे, चालक पोशि/५६० मरके अशांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button