Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

वटवृक्ष मंदिरात हर्षोल्हासाने होणार नुतन वर्षाचे स्वागत

Admin by Admin
December 28, 2024
in महाराष्ट्र
0
वटवृक्ष मंदिरात हर्षोल्हासाने होणार नुतन वर्षाचे स्वागत
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )
नुतन वर्षाच्या स्वागताकरीता पाश्चिमात्य संस्कृतीच्या चालीरितींना फाटा देत कोल्हापूर, मुंबई व राज्यातील विविध भागातील स्वामी भक्तांच्या वतीने येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात सालाबादाप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमांनी हर्षोल्हासात नुतन वर्षाचे स्वागत होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली. 
       मंगळवार दिनांक ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व बुधवार दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी नुतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी व नविन वर्षाच्या शुभमुहूर्तावर श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापूर, मुंबई, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, धुळे, नागपूर, नाशिक, रत्नागिरी, सोलापूर, सांगली इत्यादी भागासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून व देशभराच्या अन्य ठिकाणांहून बरेच स्वामी भक्त येणार आहेत.
        दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत ओम स्वामी चैतन्य भजनी मंडळ यांचे भजन, व विविधरुपी सोंगी भारूड इत्यादी कार्यक्रम देवस्थान परिसरात होतील. रात्री ७:४५ वाजता महाराजांच्या शेजारतीस सुरुवात होईल. रात्री १० ते पहाटे ४ या वेळेत कोल्हापूर, मुंबई, पुणे येथील भजनी मंडळाचे नविन वर्षाच्या स्वागताचे भजन व भावभक्तीगीतांचा कार्यक्रम देवस्थान व परिसरात होतील. दि: ३१ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजता कोल्हापूर व मुंबई येथील स्वामी भक्तांच्या वतीने गोड प्रसादाचे पदार्थ वाटप करुन व फटाक्यांची आतषबाजी करुन असंख्य स्वामी भक्तांच्या मुखाने ‘अवधुत चिंतन श्री गुरुदेवदत्त सदगुरु स्वामी समर्थ महाराज की जय’ या जयघोषाने सन २०२५ या नविन वर्षाचे स्वागत केले जाईल. याप्रसंगी उपस्थित सर्व स्वामी भक्त शुभेच्छा व्यक्त करतील व या शुभमुहूर्ताप्रसंगी स्वामींच्या चरणी नतमस्तक होवून येणारे नविन वर्ष सुख समृध्दीने व भरभराटीने व्यतीत व्हावे याकरिता समर्थांच्या चरणी साकडे घालुन पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात येईल. दिनांक १ जानेवारी रोजी सकाळी ८ ते ११ यावेळेत भजन भारूड इत्यादी धार्मिक कार्यक्रम होतील. या प्रसंगी सर्व स्वामी भक्तांच्या सुरक्षिततेकरीता व सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होण्याकरीता दिनांक ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी मंदिरात स्वामी भक्तांच्या वतीने नित्यनियमाने होणारे अभिषेक होणार नाहीत. स्वामी भक्तांच्या दर्शनाकरीता देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी नुतन वर्षानिमीत्त आयोजित या कार्यक्रमांचा लाभ घेवून व नुतन वर्षानिमित्त समर्थांचे दर्शन घेवून स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करुन घ्यावे असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे.
Previous Post

माजलगाव शहरात छुप्या पध्दतीने चालणा-या मटका बुक्की चालकांवर माजलगाव शहर पोलीसांचा छापा

Next Post

माणुसकी फाऊंडेशन अक्कलकोट दिनदर्शिकेचे  प्रकाशन

Admin

Admin

Next Post
माणुसकी फाऊंडेशन अक्कलकोट दिनदर्शिकेचे  प्रकाशन

माणुसकी फाऊंडेशन अक्कलकोट दिनदर्शिकेचे  प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156962
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697