Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

करमाळा पोलीस ठाणेची कामगिरी , सोने चोरीतील आरोपीस अटक करुन १,६०,०००- रु किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत

Admin by Admin
July 11, 2025
in क्राईम
0
करमाळा पोलीस ठाणेची कामगिरी , सोने चोरीतील आरोपीस अटक करुन १,६०,०००- रु किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
करमाळा ( आयुब शेख )करमाळा पोलीस ठाणेची कामगिरी सोने चोरीतील आरोपीस अटक करुन १,६०,०००/- रु किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. तसेच गुन्हयात वापरलेल्या मोटारसायकलसह सुमारे २,००,०००/-रु किंमतीचा मुददेमाल आरोपीकडून हस्तगत केला.
यात हकीकत अशी की, दि.१५/०२/२०२५ रोजी दुपारी ०३/०० वा चे सुमारास टाकळी चौक येथुन पुढे दोन किमी अंतरावर ता. करमाळा, जि. सोलापुर येथे यातील फिर्यादी आशा सोपान रणसिंग, वय ४८ वर्षे, रा. खातगाव, ता. करमाळा, जि. सोलापुर व्यवसाय नौकरी प्राथमिक आरोग्य केंद्र राशीन, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर या वरील ठिकाणावरुन जात असताना त्यांची पर्स खाली पडली त्यावेळी मोटारसायकल क एम एच ४२ बी एम ६५१० वरील अज्ञात इसम हा फिर्यादी या फोनवरती बोलत असताना फिर्यादीची पर्स ही फिर्यादीकडे उचलुन देण्याचे बहाण्याने फिर्यादी यांचे पर्समधील १,६०,०००/- रु किमतीचे अंदाजे १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे चैनचे गळयातील गंठण जु.वा. किं.अं. हे फिर्यादीचे संमतीविना चोरुन नेले आहे तसेच फिर्यादी यांनी सदर अनोळखी इसमास पुन्हा पाहील्यास ओळखेन म्हणुन वगैरे अशा आशयाची फिर्याद करमाळा पोलीस ठाणेस गु र नं. ११८/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे दाखल झाली.
सदर फिर्यादीचे अनुषंगाने  पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी लागलीच पथक तयार करुन त्यांना वरील मोटार सायकलची माहीती घेवून गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांना योग्य त्या सुचना देवून सदर गुन्हयाचे तपासाचे अनुषंघाने रवाना केले. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांनी सदर गाडीच्या मालकाची माहीती काढली. तसेच घटनेच्या वेळी सदर मोटारसायकल कोणाच्या ताब्यात होती याबाबत अधिक तपास केला असता सदर मोटारसायकल ही घटनेच्या वेळी इसम नामे झिंगड्या उर्फ हरी पानफुल्या भोसले, रा. टाकळी, ता. करमाळा याच्या ताब्यात होती अशी माहीती मिळाली, तसेच सदरची घटना घडल्यापासून सदर इसम हा फरार असले बाबत माहीती मिळाली. सदर माहीतीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी दोन पथके तयार करुन सदर संशयीत आरोपीची माहीती काढण्यासाठी योग्य त्या सुचना देवून खाना केले. सदर तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांना संशयीत आरोपी नामे झिंगडया उर्फ हरी पानफुल्या भोसले, रा. टाकळी, ता. करमाळा हा इंदापूर, दौंड, भिगवण, श्रीगोंदा पोलीस ठाणे हददीमध्ये वारंवार वास्तव्य बदलून राहत असल्याची माहीती मिळाली, त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांना गोपनिय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की सदर आरोपी भिगवण, जि. पुणे येथे आला आहे. सदर बातमीच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांना तात्काळ रवाना करून वरील आरोपीस ताब्यात घेतले. त्याचे कडे सदर गुन्हयाबाबत सखोल तपास केला असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली परंतू त्यास अधिक विश्वासात घेवून सखोल तपास केला असता त्याने सदर गुन्याची कबूली दिली तसेच सदर गुन्हयातील चोरी केलेला मुददेमाल गुन्हयातील चोरीस गेलेले १,६०,०००-रु किंमतीचे सोन्याचे दागिने तसेच ४०,०००-रु किंमतीची गुन्हयात वापरलेली मोटारसायकल असा सुमारे २,००,०००/-रु किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ  शेख हे करत आहेत.
सदरची कामगीरी ही . अतुल कुलकर्णी , पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण, अपर पोलीस अधिक्षक डॉ. प्रितम यावलकर , उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील , यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने, पोहेकॉ अजित उबाळे, पोना मनिष पवार, पोना वैभव ठेंगल, पोकों  अमोल रंदिल, पोकॉ योगेश येवले, पोकों गणेश खोटे, पोकॉ समाधान भराटे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोहेकॉ   व्यंकटेश मोरे यांनी केली आहे.
Previous Post

श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी आणि  सुशोभित रथाची भव्य मिरवणुक संपन्न 

Next Post

जनसुरक्षा विधेयकाविरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाणार !

Admin

Admin

Next Post
जनसुरक्षा विधेयकाविरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाणार !

जनसुरक्षा विधेयकाविरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (787)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156962
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697